पान:श्रीएकनाथ.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसंगानुसार जरी महमदीय धर्माची दीक्षा घ्यावी लागली, तरी त्याचे वर्तन पायाशुद्ध होते, हे आपल्यास पुढील लेखावरून दिसून येतेः OT "Though the virtues of this prince exceeded all that can be •comprized in the bounds of description, yet, in compliance with the custom of historians, the author (Ferishta) attempts to relate a few. Among his great qualities, were continence and modesty. When he rode through the streets of the city he never looked aside to the right or left, lest his eyes might fall upon another's wife. When he was a young man and marched to reduce the fortress of Kaweel, there was taken among the captives a young lady of exquisite beauty, who was presented as an acceptable gift to the Sultan by his first minister. Ahmedshaw was charmed with her person, but being told by her that she had a husband, who, with all her family, was among the prisoners, he bridled his desire, and restored her uncontaminated to her friends, with presents to a great amount." Ferishta's History of the Deccan. हा बादशहा इ. स. १५०८ त मेल्यानंतर त्याचा पुत्र सुलतान बुन्हाण निजामशहा बहिरी गादीवर बसला. ह्याने इ.स. १५५६ पावेतों राज्य केलें. हा आपल्या बापाप्रमाणेच शूर होता. ह्याचे कारकीर्दीत गुजराथ देशाचा बादशहा सुलतान बहादुरशहा हा फार प्रबळ होऊन त्याने निजामशाहीचे राजधानीचे शहर में अहमदनगर ते जिंकिलें. परंतु तें बादशहानें परंत मिळविलें. शेख जाफर नांवाचा त्याचा दिवाण होता, त्याच्या मूर्खपणामुळे आपल्यावर असा प्रसंग आला, व प्रजाजन व फौजेंतील लढाऊ लोकही त्याच्या स्वभावास फार त्रासून गेले आहेत, असे पाहून बुन्हाण निजामशहाने त्यास पदभ्रष्ट करून कुमारसेन नांवाच्या ब्राम्हणास पेशवाईची वस्त्रे दिली. हा ब्राम्हण फार चतुर, प्रामाणिक व पराकाष्ठेचा धूर्त होता. ह्या बादशहापासून दिवाणाचें पद ब्राम्हण लोकांस मिळत गेले अनें दिसतं; व म्हणूनच जनार्दनपंत देशपांडे एकनाथाचे गुरु मुर्तजा निजामशहाबादशहाचे दिवाण झाले असावेत अमें वाटते. प्रसिद्ध मुत्सद्दी दादू नरसू काळे हाही बुहाणशहा बादशहाचे अमदानींतच प्रसिद्धीस आला. " ह्या बादशहानंतर सुलतान हुसेन निजामशहा हा गादीवर बसला. ह्याने 3. इ. स. १५६५ पावेतों राज्य केले. त्यानंतर त्याचा मुलगा मुर्तजा निजाम-KLA शहा बहिरी ज्याचा संबंध प्रस्तुत नाटकांत आला आहे तो गादीवर बसला. एकनाथाचा जन्म १५४९ त झाला असल्याने तो ह्याच बादशहाचे कारकीर्दीत उदयास आला. मुर्तजा निजामशहाने इलिचपूरचे