पान:श्रीएकनाथ.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. खर, पन आता आमी अंधळ झाल्यावर आमच्या बायकाची पोट कोन भरील ? तुक्या-आता आमच्या बदला कोन चोऱ्या करील ? नाम्या-आन मला आता बायको तरी कोन देनार ! माझ लगिन व्हायच व्हत. आतां अंधळ्या नवऱ्याला कोन आपली मुलगी देनार ? सोपान्या–हय माझ्या शेजारी एक अंधळी मुलगी. तिच्या बाला मी सांगन आन तुला बायको करूनशान देईन. पन आतां राण्याला ही खबर कोन देनार ! (राण्या येऊन जमीनीवर अंग टाकतो.) राण्या-तुझी गेल्यावर मला त्या कोतवालाच्या शिपायानी धरल. आन राव अस मारल हय की आता मी जगत नाही. पन मी कबूल झालों नाही. आता मी मरतो. आता काय मी जगत नाही. माझ्या घरी माझे बायकोला जाऊन सांगा राण्या मेला. कुनासंगवी तूं मोहतुर लाव. हा तुमचा डबा. मी आतां जातो. (चारी अंधळे त्याला चाचपून पाहतात.) एकनाथ-अरेरे! याला फारच मारले आहे बरं का. सर्वांग रक्ताने भरले आहे. आतां तर हा अगदी मरतो आहे. आतां आपण काय करावें बरें ? गिरजा-- मला वाटते याच्या पोटांत थोडा अन्नाचा रस गेला तर याला बरे वाटेल. एकनाथ-तं अगदी खरे बोललीस. मग आणतेस का काहा तरी याला खायाला ? याला काही खाववणार नाही. पिण्यासारख कांहीं तरी आण. गिरजा-कणेरी करून आणतें म्हणजे झालें. ( जाते.) गेन्या-महाराज, किरपा करून आमच डोळ चांगल करा. आमा आपल्या पायाच चाकुर हयती. आता मोर आह्मी चोरीचा धंदा करनार नाही. एकनाथ-पण इतक्यांत तुमचे डोळे चांगले होतेनारे ! इतक्यांत त्यांना झाले तरी काय, याचे मला मोठे आश्चर्य वाटते. नाम्या-तुमच्या बायकोसनी हात लावाया गेलो मातर, आन