पान:श्रीएकनाथ.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ७१ नेतील. माझी विटंबना करतील. पांडुरंगा सोडीव आझांला या संकटांतून. एकनाथ--तुला भिण्याचे कारण नाही. खुशाल त्यांच्याबरोबर ते नेतील तिकडे जा. ते तुझे भाऊच आहेत, असे समज, आणखी अंगावरील अलंकार काढून देऊन परत ये. अलंकार देशील त्या वेळेस मनांत कृष्णार्पण असें ह्मण. गिरजा-जशी आज्ञा होईल तसें करितें. नाम्या-हे गौडबंगाल काय कामाच ! लइ भट लबाड. आह्मी नदीवर हिला घेऊनशान गेलों ह्मणजे माग कोतवालाला वर्दी देऊन आमासनी पकडून त्येच्या हवाली कराव. हा राव इचा मनसुबा दिसतुया. बस, ते काइ कामाच नाइ. आमी दोघ ह्याला हत धरूनशान ठेवतो. चाल र गेन्या. आन तुह्मी ह्या आवाच्या तोंडांत बोळा । कोंबूनशान घेऊन जा नदीवर. (नाम्या व गेन्या एकनाथास प-10 कडतात. तुक्या व सोपान्या गिरजाबाईस पकडावयास जातात. त्यांना एकदम दिसेनासे होते.) तक्या-अर इचेभन मला अंधळ कोनी केल ? मला एकाएकी - दिसनास कस झाल ? सोपान्या-आन मीबी अंधळा झालो. आता काय कराव ? अर तू हृयसर कुठ ? अर ये तुक्या. ( एकमेकांस धरावयास जातात. धडाधड पडतात.) -गेन्या-ही का चेष्टा चालवली व्हय ? नायकाला जर सांगितल तर ढुंगनावर एक एक लाथ मारत्याल. ठाव नाय अजून. चोरी कराया आलात का हजामती कराया आलात. चेष्टा हयती व्हय ? नाम्या-गेन्या, देर या बामनाला सोडून. आपुन या अवाला घेऊनशान नदीवर जाऊं. ह्या चोराना एक पैसाबी देनार नाइ. बसदे वाजवीत. (एकनाथास सोडून गिरजाबाईस धरावयास जातात. त्यांनाही दिसेनासें होतें. चौघे अंधळे झाल्यावर इकडे तिकडे चार दिशांनी "चाचपूं लागतात. रडावयास लागतात.) गेन्या-बामनबुवा आह्मी चुकलो. तुमच्या अस्तुरीला हात लावाया गेल्याबराबर आमच डोळ गेल. तुम्ही साधु हयती. हे समद