पान:श्रीएकनाथ.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. कडे तिकडे चैतन्यघन भरले आहे असा भास झाला. देह विसरून गेलें. दिवस आणि रात्र यांचेसुद्धां स्मरण नाहींसें झालें. आजपावेतों आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, ममता, भ्रांती, वासना, कुबुद्धि, निंदा, अहंता, चिंता, निद्रा ह्या माझ्या मैत्रिणी होत्या. त्यांच्या जागा आतां रिकाम्या झाल्या आहेत. एकनाथ-फार उत्तम झाले. त्यांच्या जागी आतां सुबुद्धि, शांति, दया, क्षमा आणि नम्रता यांची योजना कर. स्वामी जनादैन यांचा उपदेश होण्याच्या अगोदर माझे परमत्नेही मनाजीराव सुभेदार, बुधाजीपंत फडणीस, चित्ताजीपंत चिटणीस, अहंकाराजीपंत सबनीस, विकल्पाजी महाजन, मोहाजी शेटे, कामाजी कोतवाल, क्रोधाजी नायकवडी, द्वेषाजी जमेदार, लोभाजी पोतनीस, विकारपंत जकातदार, मदाजी देशपांडे, आणखी दंभाजी देशमुख हे होते. त्यांच्या जागी स्वामीमहाराजांचा उपदेश झाल्याबरोबर शुद्धसत्वभाव, वैराग्य, विवेक, बोध, परमार्थ, आनंद, समाधान, निर्वैर्य, स्वानुभव, धैर्य, सत्य, भजन, पूजन, भक्ति यांची योजना केली गेली आहे. गिरजा-मग लढाई मारून बादशहाच्या दुष्मानाला कैद करून बादशहाकडे कसे आणले ? याची हकीकत एकदां इकडच्या तोंडांतून ऐकण्याची फार इच्छा आहे. एकनाथ-मग फार चांगले. लढाईची हकीकत अशी झाली की, ज्यांनी ज्यांनी आमच्याघर षड्विकारांचे बाण सोडले, त्यांचे बाण निर्विकार बाणांच्या योगाने निवारण केलें. अहंता, तृष्णा, इत्यादि षडूमि यांच्या तलवारी ज्यांनी ज्यांनी मारल्या, त्या सर्व बोधरूप कुन्हाडीने तोडून टाकल्या. ज्यांनी क्रोधाचा भाला मारला त्याला शांतीच्या ढालेवर धरून बोथट करून टाकला. वासनेची गप्त कट्यार ज्यांनी चालविलो, तिचे टोंक निर्वासनेच्या चिलखताच्या योगाने मोडून टाकिलें. श्रीगुरूच्या नामाचें शिरस्त्राण धारण केल्याने मस्तकावर कोणी घाव केला नाही. याप्रमाणे लढाई करून क्रोधरूपी दुश्मनाला विवेकाच्या दोऱ्यांनी बांधून बादशहापुढे हजर केला. ( चार चोर प्रवेश करितात. ) हे कोण बरे आहेत ? यांना काय पाहिजे आहे !