पान:श्रीएकनाथ.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ, राण्या-(स्वतः सोडून घेतांना आत्मगत ) अग वया बया बया! मेलों, अगदी अगदी ठार झालो. सारी हाडन हाड मोडली. अगदी उठुन बसन्याची बी ताकद राहिली नाही. आता काय करूं. मघाशी म्हटलं काळकाई भवानी औंदा चांगली पावली, पन आता तिच्या बालापति बकर देनार नाही. लयी मार खाल्ला. सान्या जलमामंदी असा मार कवाबी खाल्ला नाही. समद्या अंगांतून रगत भळाभळा वहातया. पोटामंदी कालपुन भाकर नव्हती. आन आता मार खाऊनशान पोटामंदी आग पडलिया. आता कइ उभ राहवत नाहीं. आता खरडत खुरडत नाथाच घर गाठतो. म्हनजे त्या गेवाची आन नाम्याची गाठ पडल. आता त्याना हित आनुनशान ये शिपुरड्याचा समाचार घेतो. ( रांगत रांगत निघून जातो.) प्रवेश २ रा. स्थळ-एकनाथाचें घर. (एकनाथ व त्याची बायको गिरजाबाई प्रवेश कारितात.) गिरजा-का मनांत लग्न करावयाचे नव्हतेंना ! मग कसें लग्न लागलें ! झाले की नाहीं सावधान ! एकनाथ-ज्यांना ज्यांना म्हणून अंतरपट लागले आहेत, त्यांनी त्यांनी सावधानाच्या वेळी सावध असले पाहिजे. निमिषनिमिषमात्र हरिचरणचिंतनाविषयी सावधान असले पाहिजे. ज्यांनी आपल्या अंगी जाणतेपणा धरला आहे, त्यांना सावधानपणा राहिला नाही. जेव्हां ॐपुण्याला गांठ पडली, तेव्हांच आमची द्वैतभावाची गांठ सुटली. मायेचें वधुवस्त्र फेडून तूं अष्टपुत्री धारण केलीस. आणखी मग लोभी उपाध्ये मलीन वस्त्रासाठी एकमेकांशी भांडूं लागले. तुझ्या मनाची स्थिति त्यावेळी कशी झाली? गिरजा-चरणाची गांठ पडल्याबरोबर संदेहाच्या गाठी सुटून गेल्या. वृत्तीस समाधान झाले. शब्द खुंटला. मौन तुटलें. जि