पान:श्रीएकनाथ.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. दुसरा शि०-या वेळेस राण्या जर सांपडला, तर मोठी बहार होईल ! सरकाराकडून आपल्याला मोठे बक्षीस मिळेल. तिसराशि०-राण्या सांपडणे ह्मणजे तोंडच्याच गप्पा असतील ? आपल्यापैकी एकादोघांला ठार करील, तेव्हां राण्या हाती लागेल. राण्या-(एकीकडे ) हा मातर अगदी खर बोलला. पन काय करूं मजप हत्यार नाही. बर झाल, मी समद पुरुनशान टाकल. ते यांच्या बालाबी गवसनार नाही. आन त्या चौघालाबी गवसनार नाही. आतां काय बरं सोंग कराव ? यानी तर आपल्यासनी पघितलं. आता येंच्यासंग दोन हात कराव. का येड्याच आन मुक्याच आन बहिऱ्याच सोंग घ्याव ? नाइतर अदुगर धिंगामस्ती करून एकाची तलवार हिसकुन घ्यावी. आन मंग येडा बहिरा आन मुका बनावं. ( भय दाखवितो. एका शिपायाच्या कमरेला मिठी मारतो. तलवार हिसकावून घेतो.) पहिला शिपाई-पकडा हरामखोराला. हाच तो राण्या. मी पक्का ओळखला. ( पुष्कळ झटापटी होतात, त्यांत राण्या हटला जाऊन शिपायांच्या स्वाधीन होतो.) दुसरा शिपाई-बोल चोरा, आज देशपांड्या मनसबदाराच्या घरी चोरी कोणी केली ? (तो बोलत नाही, असे पाहून त्याला मारतात.) तिसरा शिपाई-अरे हा मुका आहे. याला बोलतां येत नाही. मला वाटते हा राण्या नव्हे. चवथा शिपाई- अरे याने मुक्याचे ढोंग केले आहे, दुसरे काय ? याची चांगली कणीक मऊ केली, म्हणजे आपोआप बोलायला लागेल. (राण्याला खूप मारतात. राण्या खुणा करून सांगतो की, मी मुका आहे, मला मारू नका. मला चोरीची बातमी सुद्धा नाही. वेडे वेडे चार करतो. शिपायांच्या हातून निसटून जाण्याचा प्रयत्न करतो.) ५ पहिला शि०-आतां असें करूं नका. याचे हात पाय बांधून याला येथेच ठेवून आपण आणखी याचे काही साथीदार हिकडे तिकडे असतील, त्यांचा शोध करूं. (राण्यांचे हात पाय बांधून त्याला लाथा मारून निघून जातात.)