पान:श्रीएकनाथ.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० श्रीएकनाथ. सोपान्या, तुम्ही चौघबी नदीच्या कडला त्या एकनाथ्याच्या घरी जा. आतां पहार रात उरली असल. हळुच त्याच्या घरामंदी शिरा. आन तो म्हातारा आन म्हातारी, आन समद्याना आता गार झ्वाप लागली असल. लगनामंदी संमद दमुनशान गेलती. घरामंदी शिरून नवरीमुलीला उचलुन आना हत. मग घेऊ समद लुबाडुनशान आन देऊ राव हाकुन. जाउ दौलताबादाला शहरामंदी आन तथ घालू त्या सोनाराच्या पदरांत समद. नाइतर जाऊ बादशाच्या फौजमंदी शिपाईगडी बनुनशान. नगेन्या-बर हय नाइक साब. आमी जातो तकड हुकमापरमान. पन हे संबाळा संमंद. नाइतर कोतवाल लइ वंगाळ हय. गावामंदी गस्त फिरतीया. आन आमी जाऊ तकड. आन हत समद होईल वाटुळ. म्हुनशान मनतो. राण्या-अर हा नावाचा राण्या हय.समजलास ? कोतवालाच्या बाला दात द्यायचा नाही. जा. तुझी सवस्त. ( चौघे जातात. राण्या आत्मगत ह्मणतो.) औंदा. काळकाई मला चांगली पावलीया! काय ) बर डाग हयती ! ( मोजतो ) मोत्याची पेंडकी हयती. आन आमच्या अस्तुरीन घातली म्हुनशान काय झाल ? तीबी बामनिनीगत दिसल. आन मुरका मारिल तव्हा पोटामंदी कशा गुदगुल्या होत्याल ! आन ही नथ ! अग बया बया! हजार रुपयाची असल ! ही देईन नाकांत लटकाउन. आन मंग तर काय तोंडाकड पाहूनशान समद लोक लाळ घोटाया लागतील लाळ घोटाया! आन म्हनतील, रान्या, लेका कुटर गेलतास रोजगाराला ? ते जाऊ द्या. आता हा डबा या झाडाखाली पुरुनशान ठेवावा, आन आपुन सवस्त झ्वाप घेवी. आन ते आल म्हनजे मंग समद वाटूनशान घेऊ. ( डबा पुरून ठेवतो. कोतवालाचे शिपाई प्रवेश करितात. राण्या लपून बसतो.) पहिला शिपाई-हा राण्या नाईक आज येथे आलेला आहे, यांत शंका नाही. त्याच्याशिवाय हे काम झालेले नाही. राण्या-(एकीकडे ) हा तुमचा बाप हत उभा हय. माझ्याप हत्यार अस्त तर समद्याचा समाचार घेतला असता.