पान:श्रीएकनाथ.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक चवथा. प्रवेश १ ला. स्थळ-डोंगरांतील गुहा. (पांच चोर दागिन्यांचा डबा घेऊन प्रवेश करितात.) राण्या-अपुन इचेभन कांहीं निसत च्वार नाही. सूर शिपाई मर्द आहो. गेन्या-शिपाई मर्द ! दरोडेखोर-खून करणारे-समद्या गावाला मरिआईची सात तुम्ही हय्ती. अन् म्हन आह्मी शिपाई मर्द, अन् आह्मी नबाब सुभदार. तुक्या -नई मर्दानु, अपुन रनसूर हस्ति. पन काम लइ वंगळ करतुया. नाम्या-कायर वंगळ काम करतुया ! तुक्या ! लइ लइ वंगळ म्हनतुस ! सोपान्या-सुभदाराचा हुकुम तुम्ही तोडता. लोकांना लइ ताप देता. लोकांची घर फोडता, अन् चोऱ्या करता. राण्या-अन मी म्हनतो, तोफलखान सुभेदारान काय केल ? त्यान नाइका लोकाला ताप दिला ! दौलताबादला येतांना रस्त्यान गाव जाळली ? आन लोकांची घर फोडूनशान समदी दौलत लुटुनशान नेली ? आन हजारो लोकांनाबी ठार मारल ! आन मुसलमान बी केल ? मंग आता आमी सुभेदारापुन चांगल नव्ह का ? गेन्या-पन काही जरी झाल, तरी तुला च्वार म्हनतील. आन त्येला सुभदार बनतील. राण्या-आन सुभदार तरी काय करतो ? आपला मुलुख लइ वाढावा झनुनशान हजारो फौज गोळा करूनशान दुसन्या गुलसा सवारी करतो. आन मंग त्याच्या हजारो लोकांची कत्तल करतो. मग काही गरीब पहातुया का ? आर मी म्हनतो, आनी चार,