पान:श्रीएकनाथ.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. वंशवृक्षास सुंदर फळे यावीत ह्मणून तूं गृहस्थाश्रम स्वीकारावा. सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम उत्तम आहे. याची थोरवी अशी आहे की, यांत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता येतात. षड्रिपु जिंकण्याचे प्रसंग जसे संसारांत येतात तसे अरण्यांत जाऊन येत नाहीत. स्वेच्छेनें वरण्याकरितां जी वधु तुला आलेली आहे, तिचेंच पाणिग्रहण कर. ती महा पतिव्रता आहे. कळावें हे आशीर्वाद." स्वामीची आज्ञा अशी आहे की, हे पत्र तुझ्या हातांत जेथे पडेल तेथेच रहा. आतां मी या जागीच मुक्काम करीन. हे माझें कायमचंच घर. मी आतां येथेंच राहणार पुराणीक-इतका विपरीत अर्थ करण्याचे कारण नाही. येथे राहून ऊन, थंडी, पाऊस, वारा यांचा ताप होणार आहे. आपण घरी चलावें. एकनाथ–नुसत्या जमिनीवर निजणे आणि पलंगावर परांच्या गादीवर निजणे मला सारखीच वाटतात. घोंगडी पांघरणे आणि शालजोड़ी पांघरणे मला सारखीच वाटतात. नुसती भाजी खाणे आणि शाल्योदन खाणे सारखीच. सुख आणि दुःख मला सारखीच भासतात. सर्वत्र सद्गुरु जनार्दन भासत आहे. घरी येणार नाही असें नाही, परंतु मुख्य ठिकाण हेच. येथेच गृहस्थाश्रम करावयाचा. गावबा-मी येथे तुमचे सेवेला राहतो म्हणजे झाले. कोणी तरी आपल्याला येथे एक छानदारसें घर बांधून देईल तर बरे होईल? चक्रपाणि कां मुली, झाले कां तुझ्या मनाप्रमाणे ! मिळाला का एकनाथ तुला भ्रतार? गिरजा—(हंसते) माझा जीव गेलेला पुनः परत कसा आला. मला वाटलें जशी कांही मला झोपच लागली होती. आता माझ्या बापाला किती तरी आनंद होईल! सरस्वती-मुलगी पायगुणाची झालीहो. तिच्या भाग्याने माझा एकनाथ मला पुनः भेटला. इतकेच नाही परंतु माझ्याजवळ निरंतर राहिला. ( गिरजाबाई सर्वांच्या पायां पडते. पडदा पडतो.)