पान:श्रीएकनाथ.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शांतवृत्ति, सहनशीलता, व मनोनिग्रह पाहून अंतरशुद्धि झाली नसता ब्राम्हण धर्माची घमेंड मिरविणाऱ्या कितीएक कुत्सित बुद्धीच्या लोकांना ज्याला शरण जावे लागले व ज्याने आपली योग्यता केवळ प्राच्यदेशीय सॉक्रेटिसापेक्षा अधिक करून घेतली; प्रत्यक्ष स्वस्त्रीला भरजनसमुदायामध्ये एका द्रव्यलोभी शटाने धरिली असतां ज्याचा सहनशीलतेचा मनोरा बालाग्रही ढळला नाही, यामुळे ज्याला अजातशत्रु युधिष्ठिराची साम्यता आली; जो साधुवृंदांचें शिरोभूषण, मोठमोठ्या तत्ववेत्यांनी व पंडितांनी जी जी लक्षणे साधूंचे ठायी असावीत असे प्रतिपादन केले आहे, ती सर्व ज्याचे ठिकाणी जागृत होती, इतकेच नाही परंतु जो सन्मणिमालेत चमकलेला, जो संसारांत असून अलिप्त, ज्याची कृति अखंडदंडायमान, जो ईश्वराचे ठिकाणी तादात्म्य पावलेला, त्रिपुटी मावळलेला, तद्रूप झालेला, केवळ विष्णूचा अवतार;ज्याने वेदाध्ययन व तपव्रतें न करणाऱ्या स्त्रीशूद्रांना आपल्या ? भागवत धर्मानें ईश्वरप्राप्तीचा सुलभमार्ग दाखविला; आशा कल्पना ज्या र भवनदीच्या दरडी आहेत, ज्या नदीचा मायारूपी जळाचा ओध सोसाट्यान वाहत आहे, जीमध्ये मोहरूपी मासे कीडत आहेत, भ्रांतीच्या सुसरी X गळात आहेत, अहंकाराच्या लाटा उसळत आहेत, कामक्रोधाचे भोंवरे बुडवून तळला पोचवीत आहेत, अशा अति दस्तर भवनदींतन सदरुरूपी सांगडीनें जो दंड थोपटून सहज पैलतीरास निघून गेला; ज्याने श्रीभावाथ रामायण, रुक्मिणीस्वयंवरासारखे चरित्रविषयक ग्रंथ केले, व स्वात्मसुख, चतुःश्लोकी भागवत, हस्तामलक, आनंदलहरी, व श्रीमद्भागवताचे एकादशस्कंधावर सुरस टीका करून आपला कीर्तिरूपी ध्वज भक्तिरूपी मंदिरावर अक्षय फडकावयास लाविला; अशा श्रीएकनाथ महाराजांचें चरित्र नाटकरूपाने मार्मिक जनापुढे मांडण्यास त्यांच्यासारखाच थोर मनाचा आणि कुशाग्र बुद्धीचा साधु पुरुष पाहिजे होता, परंतुः-- कां ने लळेयाचे लळे सरती ॥ मनोरथांचे मनोरथ पुरती ॥ जरी माहेर श्रीमंतें होती ॥ तुह्मां ऐसी ॥१॥ ना तरी बाळक बोबडां बोलीं ॥ वांकुडा विचुका पाउली ॥ तें चोज करूनि माउली ॥ रिझे जेवों ॥२॥ तसें तुमचें अवधान धाय ॥ आणि तुह्मी ह्मणा हे होय ॥ ऐस वक्तृत्व कवणा आहे ॥ जेणे रिझा तुह्मी ।। ३ ॥ व प्रगटितिया गभस्ती॥काय हातिवन न कीजे आरती।। का चुळोदकें अपांपति ॥ अर्घ्य न दीजे ॥४॥ अतुमा महेशाचिया मूर्ती आणि मी वळा अचितसें भक्ती।। ह्मणानी बाल जरी गंगावती ॥ तन्ही स्वीकाराल का "" तरिवि