पान:श्रीएकनाथ.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. धीरता ! ( एकनाथ जाऊ लागतो. :) हां थांब, काय एकनाथ, तुझें काय ह्मणणे आहे ? एकनाथ-( पुराणीकास नमस्कार करून) पुराणीकबुवा, मी यांना पुष्कळ समजावून सांगितले. सहा महिन्यांत दक्षिणमानस यात्रा करून चरणांची सेवा करण्यास हजर होतो. पण यांची समजूत पडली नाही. मला तर गुरूंची आज्ञा मोडता येत नाही. तुही तरी यांची समजूत पाडा. पण समजूत पाडण्याचा काल आतां निघून गेला. यांच्या शरीरातील प्राणज्योति मावळली. ही उभयतां ममतेच्या पाशाने माझ्याकरितां बळी पडली ! त्याचप्रमाणे ही भोळी मुलगी हट्टीपणाने सर्वस्वी आपल्या जीविताला आंचवली! पुराणीक-ही जनार्दनपत्रिका. हें. श्रीदत्ताचे चरणतीर्थ. स्वामींनी अशी आज्ञा केली आहे की, हे तीर्थ तूं आपल्या हाताने त्रिवर्गाच्या मुखांत घाल, म्हणजे त्रिवर्ग पुनः सावध होतील. (एकनाथ तसें करतो. त्रिवर्ग उठून बसतात.) गावबा-पण ही बाई कोण आहे ? हिला येथेच झोंप आली होती की काय ? (निरखून पाहून ) हे आपले पुढे होणारे कुटुंब ! यांची समाधि तर नव्हतीना लागली! तुला अत्यंत आनंद होईल अशी गोष्ट सांगतो. अहो आजोबा, अहो आजीबाई, एकनाथाबद्दल तुझी तिळमात्र दुःख करूं नका. तुमाला सर्वाला हे पुराणीकबोवा आज जे आहेत ते अत्यानंद देणार आहेत. तुझी यांना जे आहेत तें लाडूंची वायनें एकनाथ-(पत्रिका मस्तकावर धारण करतो.) हे अक्षर स्वामींचेंच आहे. काय ह्मणतात महाराज ? "अनेक आशीर्वाद. तुझी आजाआजी तुझ्या वियोगाने आसन्नमरण झाली आहेत. बदापकालीं त्यांची तं सेवा करावी हा तुझा धर्म आहे. हीच तुझी तीर्थयात्रा. त्यांची सेवा केली झणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचीच सेवा केल्याप्रमाणे आहे. करितां हे पत्र तुझ्या हातांत पडतांच पुढे न जातां तेथेंच रहा व त्यांना संतोष दे. दुसरे असे की, भानुदासाच्या वंशांत तंच कायतो एक आधारतंतु उरला आहेस. तूं परम विरक्त आहेस हे मी जाणून आहे. परंतु आजाआजीस संतोष व्हावा, भानुदासाच्या