पान:श्रीएकनाथ.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. महिन्यांत आपल्या चरणांची सेवा करण्यास हजर होतो. मला जाण्याची अनुज्ञा असावी. नाही तर गुरूची आज्ञा भंग केल्याचा दोष मला लागणार आहे. । सरस्वती-मी तुला एक क्षणभरसुद्धा सोडणार नाही. सहा महिने मला असंख्य युगाप्रमाणे वाटणार आहेत. आमचा उभयतांचा आतां घटकेचा भरवसा नाही. सहा महिने तूं आझांला सोडून जाऊ नको. एकनाथ-मला तुझी दुष्ट, निर्दय, नीच कांही झटले तरी हरकत नाही. मांगहृदयाचा म्हणा, वाटेल ते म्हणा, परंतु मी गुरूच्या आज्ञेस पाठ करणार नाही. मला गेलेच पाहिजे. चक्रपाणि-हायरे देवा ! एकनाथ, तूं आझाला सोडून चाललास! अरे, आझी कोणाकडे पाहून दिवस काढावे ? आझांला उभे राहण्याची शक्ति राहिली नाही. अशा स्थितीत आमाला टाकून तुझें पाऊल तरी कसें उचलतें ? तूं तिकडे गेलास की, आमचे उभयतांचे देहावसानच झाले ह्मणून समज. आमचें औदारिक कार्य करण्यास प्रत्यक्ष आमचा पौत्र जवळ असून आह्मांला नाहीसा झाला आहे. पांडुरंगा, सोडवा मला! ( एकनाथ जाऊं लागतो. त्यास उभयतां प्रतिबंध करितात. त्यांना सोडवून एकनाथ जाऊं लागतो. पुराणीक व गाववा प्रवेश करितात. चक्रपाणि व सरस्वतीबाई मूर्छित पडतात.) एकनाथ-हा अभाग्या एकनाथा ! प्रत्यक्ष आईबापाप्रमाणे ज्यांनी माझा प्रतिपाळ केला, ज्यांनी मला लहानाचे मोठे केलें. माझ्याकरितां ज्यांनी हा कालपावेतों असह्य यातना भोगिल्या, त्यांच्या मृत्यूस मी सर्वप्रकारे कारणीभूत झालों! पण विचार केला असतां मी कोण यांचा आणि हे कोण माझे ? मी जाणार, गुर्वाज्ञा मोडणार नाही. पुराणीक-हाच तो. बरा सांपडला. प्रत्यक्ष आजाआजी आसन्नमरण होऊन धरणीवर पडली आहेत ! बिचारी गिरजाबाई याच्याकरितां प्राण ब्रह्मांडी नेऊन धरणीवर निचेष्ट पडली आहे. पण याच्या मनावर त्याचा काहीच परिणाम नाही. केवढी याची सत्व