पान:श्रीएकनाथ.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. केल्याप्रमाणे भासत आहे. खरेच सांगा, तुमाला पांडुरंगाची शपथ आहे. माझा एकनाथ कोठे पाहिला काहो ? सरस्वती-अहो, तुझी कांहीं ह्मणा, हाच तो. मी पक्का ओळखिला. ते पही त्याचे डोळे पाण्याने भरून आले. त्याच्याने बोल-ल वत नाही. चक्रपाणि-बाळा एकनाथा ! सरस्वती-एकनाथा ! (एकनाथ जाऊं लागतो. दोघे जाऊन त्याच्या गळ्यास मिठी मारतात.) एकनाथ-बाबा, मी तुमचा लाडका एकनाथच आहे. सरस्वती-एकनाथ ! तूं कसारे आझांला सोडून निघून गेलास ! अरे आझी तुझ्याकरितां घरोघर शोध करीत हिंडलों. कोणी यात्रेकरू भेटला की, आमी त्याला तुझी माहिती विचारावी. त्याने नाही झटलें तर हिरमुष्टी होऊन परत जावें. अशा त-हेने आह्मी दिवस काढले. आता मात्र कुडीत प्राण फक्त जिवंत राहिले आहेत. अंगांत तिळमात्र शक्ति उरली नाही.. एकनाथ-आजी, बाबा, मी तुम्हांला फार दुःख दिले. मी मोठ्या कठोर मनाचा आहे, असें तुम्हांला वाटत असेल; परंतु तुम्हांला दिलेल्या विपत्तीबद्दल मी फार उत्तम भरपायी केली आहे, स्वामी जनार्दनमहाराजांची अहोरात्र सेवा करून त्यांना मी प्रसन्न करून घेतले. ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्यांनी मला केला; आणखी शेवट असा गोड झाला की, त्यांच्या रुपेकरून मला प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयाचे दर्शन झाले. चक्रपाणि-अहाहा! धन्य धन्य माझा एकनाथ ! तूं जन्मार्च सार्थक करून घेतलेंस. आम्ही मायापशांत गुंतन व्यर्थ दिवस घालविले. भानदासाच्या वंशाचें पुनर्जीवन केलेंस. मला अत्यंत समाधान झाले. आजपावेतों झालेले दुःख मी विसरून गेलो. आतां मात्र आम्हांला सोडून तूं कोठें जाऊं नको.. । एकनाथ-स्वामीची मला अशी आज्ञाच आहे की, सर्व तीर्थयात्रा झाल्यानंतर पैठणास येऊन आपली सेवा करावी. उत्तरेकडील माझी सर्व तीर्थं झाली आहेत. आतां मी दक्षिणयात्रा करून सहा