पान:श्रीएकनाथ.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ऐकतांच प्राणत्याग केला, तसेंच ही करील. आता काय करावें ! ( लांब पाहिलेसें करून ) हे दुसरें भयंकर संकट उद्भवलें ! आजा आणखी आजी इकडेच येत आहेत. आतां काय बरें करावें ! आतां इला अशीच येथे ठेवून आपण जरा लांब जावें. आणखी यांचा डोळा चकवून झपाट्यासरसें निघून जावें. जय जनार्दनमहाराज, सोडवा मला आतां या संकटांतून (झपाट्याने जाऊं लागतो. चक्रपाणि व सरस्वतीबाई प्रवेश करितात.) मान चक्रपाणि-अहो बुवासाहेब, अहो बुवासाहेब, जरा माघारे फिरा हो. एक शब्द माझ्याशी बोला, नंतर जा. एकनाथ-(एकीकडे ) टक्कल पडलेल्या एका मनुष्याचे डोके उन्हाने तापलें याकरितां सावलीत बसावे म्हणून तो एका झाडाखाली गेला, दुर्दैवाने ते झाड नारळाचे होते. तेथे बसणार, तो इतक्यांत झाडावरून एक फळ पडून ताड्दिशी त्याच्या डोक्यावर आपटलें. दुर्दैवी मनुष्य कोठे गेला तरी तेथें विपत्ति ठेवलीच आहे ! काय ही बाबांची स्थिति झालेली आहे ! आजीकडे तर पहावत नाही. माझा कंठ भरून आला. माझ्याने पाऊल पुढे टाकवत नाही. इकडे गुरूची आज्ञा भंग केल्याचा महादोष ! इकडे मातृपितृहत्या ! माझ्यासारखा दुष्ट अभागी या जगांत नाहीं ! बरेवाईट कोणतेही काम करण्यापूर्वी शहाण्या मनुष्याने त्याचा परिणाम व्यानांत आणावा.. नाही तर पश्चात्ताप मरेपर्यंत मनाला टोचीत असतो. मनांतल्या मनांत माझ्या वृद्ध आजाआजीला नमस्कार करतो. ( उघड ) काय ह्मणतां महाराज! चक्रपाणि-हे पहा, सुख मिळण्याची आशा नष्ट झाली. बरोबरचे जिवलग मित्र स्वर्गीस गेले. काठी धरूनसुद्धां उभे रहाण्याची पंचाइत पडु लागली. तथापि हा निर्लज्ज देह अजून मरणाला भीतच आहे. याला एकनाथाची आशा आहे. आमचा नातू एकनाथ आमांला अशा वृद्धापकाळी सोडून गेला. त्याने मोठे निष्ठर मन केलें.. रात्रंदिवस आझांला चैन नाही. अन्न गोड लागत नाही. माशा. प्रमाणे आह्मी तडफडत आहों. रात्र वर्षाएवढी वाटते. आमची अंधज्याची काठी नाहीशी झाली. आह्मा अंधळ्यांना तप्त भूमीवर उभे