पान:श्रीएकनाथ.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. करा, असें मी म्हणत नाही. आपण तीर्थयात्रा करून वर्षाने दोन वर्षांनी परत याल, त्यावेळी मी तुझें पाणिग्रहण करीन, असे मला वचन द्या. म्हणजे माझें कांही म्हणणे नाही. शिवाय मामजी आणि सासूबाई यांचे दर्शन घेतल्याशिवाय आपण जाऊं म्हणतां ? आपल्या पश्यात् त्यांचा अंत झाल्यास ते प्राण निघून जाईपर्यंत आपल्या नांवानें टाहो फोडतील ! त्यांची उत्तरक्रिया कोण करणार ? या सर्व गोष्टींचा पोक्त विचार व्हावा.. एकनाथ-(एकीकडे ) व्यर्थ व्यर्थ मी पैठणास आलों ! माझी स्थिति एखाद्या जाळ्यांत सांपडलेल्या वाघाप्रमाणे होऊन बायकामुलांनी त्याला जसे खडे मारावेत तशी झाली आहे. ( उघड ) आतां यावेळी मी कसे वागावें असें तुला वाटते ? गिरजा-मला असे वाटते की, आपण आजाआजीस भेटून त्यांची आज्ञा घेऊन नंतर जावे. त्यांच्या समक्ष लग्न करीन अशी शपथ घ्यावी. एकनाथ-पर्वताच्या शिखरावरून उडी घालन शरीराचे तुकडे तुकडे करीन. भयंकर सर्पाच्या जबड्यांत हात घालीन. पेटलेल्या भडाग्नीत उडी घालीन. पण गुरूची आज्ञा मोडणार नाही. तुझा विचार मला कबूल नाही. मी जाणार, एक पळभर येथे राहिलों की माझा सर्वस्वी घात होणार आहे. ( जोराने जाऊं लागतो.) गिरजा-बरें, मला नुसते वचन तरी द्या. ह्मणजे चातकपक्षाप्रमाणे मार्गप्रतिक्षा एकनाथ- काही होणार नाही. गिरजा-प्राणत्याग करीन. एकनाथ-त्याचा दोष माझ्याकडे नाही.. गिरजा-श्रीशंकराची शपथ घेऊन सांगते की, आतांच्या आता मी देहत्याग करीन. ही पहा चाललें-इहलोक सोडून जाऊं-जाऊंजाऊ ? (एकनाथाच्या अंगावर मूच्छित पडते. )ni एकनाथ-(एकीकडे ) खरोखरच इनें स्वास कोंडून धरून प्राण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ! कदाचित जयदेव कवीच्या बायकोप्रमाणे ही महापतिव्रता असेल. तिने जसा आपला पति मेला असें