पान:श्रीएकनाथ.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. - नेहमी आपल्या आज्ञेत वागेन. काडीमात्र अवज्ञा करणार नाही. वस्त्रालंकारांची मला अपेक्षा नाही. रात्रंदिवस चरणाची सेवा करीन. पाहिजे असल्यास मी अशीच आपल्याबरोबर तीर्थयात्रेस येते. मला आपल्या संगतीनें में सुख होणार आहे, तें त्रिभुवनीचें राज्य दिलें तरी होणार नाही. एखाद्या क्षुधितापुढे ज्याप्रमाणे अलंकारांनी भरलेलें ताट ठेवावें, अथवा अरसिकाला साधूचे महत्त्व सांगत बसावें, त्याप्रमाणे आपला उपदेश व्यर्थ आहे. आपल्याशिवाय मला गति नाही. एकनाथ-(एकीकडे ) विद्वान् किंवा अविद्वान् कसाही असला तरी त्याचे सत्वभंग करून त्याला कुमागास नेण्यास स्त्रिया समर्थ आहेत. याकरितां कोणत्याही स्वीपाशी एकांती बसूं नये. कारण । इंद्रिये बळकट आहेत. ती विद्वानाससुद्धां ओढतात असें मनुस्मृतीत सांगितले आहे. ( उघड ) तूं फार सुज्ञ आहेस ह्मणून मी तुला विनंति करतों की, माझा नाद तूं सोडून दे. मनांतली गुप्त गोष्ट तुला सांगतो. माझे परमपुज्य गुरु भगवान् श्री जनार्दनस्वामी यांची मला अशी आज्ञा आहे की, तूं प्रथम सर्व तीर्थे करावी. ज्योतिर्लिंगांची दर्शने घ्यावी. पुण्यक्षेत्र पहावी. नंतर आपल्या आजाआजीची सेवा करावी. आतां या गोष्टींपैकी काही एक न करता मी जर तुझें पाणिग्रहण केले, तर गुरूची आज्ञा उल्लंघन केल्याचे महापापाचे खापर माझ्या बोडक्यावर फुटणार. सगळ्या जगांत माझ्यासारखा दुराचारी, नीच, अधम कोणी नाही. विषयसुखाला लंपट होऊन आजपर्यंत केलेल्या वेदाध्ययनाला, प्राप्त करून घेतलेल्या ब्रह्मज्ञानाला काळोखी लावली. भूमीला भारभूत केवळ पशु उत्पन्न झालों असा माझा लौकिक होईल. ह्मणून विनंति आहे की, तूं फार धूर्त आहेस, सर्व गोष्टींचा विचार कर, आणखी माझा नाद सोडून दे. मी आतां जातो. गिरजा-हां जाऊ नका. देवगतीने समुद्रांतली कमलें नाहींशी झाली, तरी कोंबड्याप्रमाणे हंसपक्षी उकीरडा उकरूं लागतील काय ? तसें मी इकडचा त्याग करून आपल्या बापाला स्थळांविषयीं कांहीं एक सांगणार नाही. आपण म्हणतां त्या गोष्टी मला कवल आहेत. आपला जो लौकिक तोच माझा लौकिक. आतांच आपण करग्रहण