पान:श्रीएकनाथ.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. घून गेले पाहिजे ह्मणजे दक्षिण दिशेकडील सर्व तीर्थ होतील. नाहीं तर गुरूची आज्ञा भंग केल्याचा दोष माझ्या माथी लागणार आहे. गिरजा-का बुवासाहेब, कसला विचार चालला आहे ? तुझी माझ्या दुःखाचा प्रतिकार कोणत्या रीतीने करणार सांगा की ! एकनाथ-मी ह्मणतों तुमची आणि त्याची प्रत्यक्ष गांठ पडली, तर तुझी त्याला काय झणणार ? ज्याचा तो मोकळा आहे. कोणी कोणाचा बांधलेला थोडाच आहे ! (जाऊं लागतो.) गिरजा-(एकीकडे ) या बोलण्याचा अथ काय बरें ? मला वाटते माझें भाषण समक्षच चालले आहे. आतां माझ्या मनाची खातरी होत चालली. तेच ते. या वेळी माझे वडील अगर चक्रपाणि मामंजी येथे असते, तर फार उत्तम झाले असते. कारण स्वारी जाण्याच्या तयारीत आहे. शंकरा, या वेळी मला दोन शब्द बोलण्याचे ज्ञान आणि धैर्य दे. इतका वेळ मी भाषण केलें, पण त्यावेळी माझ्या मनाला भीति मुळीच वाटली नव्हती. आतां लज्जा आणखी भीति यांचा पगडा माझ्यावर बसला. पण या प्रसंगों धैर्यच धरिलें पाहिजे. ( उवड ) हे पहा, मी त्यांना असे विचारणार की, आजपावेतों जे जे मोठमोठे साधु झाले; उदाहणार्थ नामदेव, दामाजीपंत, चोखामेळा यांनी का बायका केल्या नव्हत्या की काय ? मोठमोठ्या साधूनां तरी जन्म साध्वी स्त्रियांनीच दिले आहेत. ज्ञानेश्वरमहाराज, शुकाचार्य, भानुदास अथवा कबीराचा कमाल यांचे जन्म स्त्रियांपासूनच झालेले आहेत.यावर ते काय ह्मणतील? ( एकनाथ जाऊं लागतो.) कां आपण कांहीं बोलत नाही ? मघांचा आपला आशीवाद बहुतक निष्फळच आहे. एकनाथ-मी तुला खरेंच सांगतों, तं ज्याच्याकरितां इतके कष्ट करीत आहेस, तोच मी. तूं इतकी चतुर, शहाणी आणखी बहुश्रुत आहेस की, मला बोलण्यांत कंठित करतेस. तुझें ह्मणणे सवप्रकारे उक्त आहे. आतां माझा मनोदय असा आहे की, गृहस्थाश्रम मला कर्तव्यच नाही. याकरितां तूं माझा नाद सोडून दे. आपल्या वडीलांस समजावून सांग, आणखी या माझ्या सत्कृत्यास मदत कर. गिरजा-(एकीकडे ) माझा तर्क अगदी खरा झाला. (उघड)