पान:श्रीएकनाथ.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Mer अंक ३ रा. ( उघड ) उघडच आहे, ज्याने आपल्या वृद्ध आणखी परमपूज्य आजाआजीचा त्याग केला, व जो ब्रह्मज्ञानाची प्राप्ति करून घेण्याकरितां निघून गेला, तो पुढे होणाऱ्या बायकोची गरज कितीक बाळगणार ? दुष्टच तो! अशा मनुष्याचा नाद सोडून द्यावा. तुमच्या वडिलांनी दुसऱ्या स्थळाची योजना करावी, हे माझ्या मते फार चांगले आहे. मग तुझी तसें कां करीत नाही ? गिरजा-माझी खातरी आहे की, पांडुरंगाचा दृष्टांत असत्य होणारच नाही. माझ्या वडिलाचा आणि माझा स्वतःचा असा संकल्प आहे की, दुसरे स्थळ पहावयाचेच नाही. त्यांतून माझी तर अशी प्रतिज्ञाच आहे की, त्यांच्याशिवाय इतर पुरुष मला केवळ बापा-भावा-प्रमाणेच एकनाथ-अरेरे ! अशी अभद्र अक्षरें मुखांतून काढूं नको. ज्याला तूं कठोर अंतःकरणाचा ह्मणतेस, तो कदाचित् वेडा असेल, अथवा गृहस्थाश्रम करून मुलाबाळांचें सुख, अशा सुंदर स्त्रीची संगती, त्याला विषतुल्य वाटत असेल. त्याच्यासाठी तूं आपल्या देहाला कां श्रम देतेस ? गिरजा-नुसते श्रम देत नाही, परंतु त्यांच्याकरितां मी आपला प्राण सुद्धां खची घालण्याला एका पायावर तयार आहे. ते ज्यावेळी पैठणांतून नाहीसे झाले, त्याच वेळी मी गंगेत उडी टाकून प्राणत्याग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांत मला यश आले नाही. त्यांच्या प्राप्तीकरितां मी कडक व्रतांचे आचरण करितें, बहुतकरून मी नेहमी उपोषित असते. रात्रंदिवस त्यांचें ध्यान आणखी त्यांच्या नांवाचा जप मी करीत असते. त्यांची आजाआजी मला सूनबाई म्हणून हाक मारितात, मला जवळ घेतात, आणखी टपटप अश्रु गाळू लागतात. एकनाथ-(एकीकडे ) या वेळी मी येथे आलो आहे, हे जर त्यांना कळले तर त्याचा परिणाम फारच भयंकर होईल. मला तर गुरुमहाराजांची आज्ञा अशी आहे की, भरतभूमीवरील सर्व तीर्थे करून नंतर त्या वृद्धांच्या सेवेला जावें. आतां येथून लवकर नि