पान:श्रीएकनाथ.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. गिरजा-आपण माझ्या दुःखाचा प्रतिकार कसे करणार ? मला तर असे वाटते की, प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला, तरी त्यालासुद्धा माझ्या दुःखाचा प्रतिकार करता येणार नाहीं; मग तुह्मी तर मनुष्यच आहांत. g एकनाथ-(एकीकडे ) अरेरे ! गरीब बिचारी इतक्या तरुण वयांत इच्यावर कोणता एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे बरें ? (उघड ) मला तुमच्या दुःखाचा वाटेकरी काल काय ? मला तुमच्या दुःखाची कहाणी ऐकण्याची मोठी इच्छा उत्पन्न झाली आहे. गिरजा-आपण ज्या अर्थी इतका आग्रह करीत आहां, त्याअर्थी सांगते. महासाधु भानुदास. ज्याने श्री पांडुरंग प्रसन्न केला होता, त्याचे नांव आपल्यास ऐकून माहीत आहे काय ? एकनाथ- (एकीकडे ) हे प्रकरण तर अंगावरच येत चाललें. ( उघड ) त्यांचे नांव माहीत नाही असा या आर्यभमीत कोण आहे ? बरें पुढे काय ? गिरजा-माझ्या बापास पांडुरंगाचा असा दृष्टांत झालेला आहे की, त्यांच्या वंशांत मला द्यावी. ही गोष्ट चक्रपाणि महाराज भानुदासाचे पुत्र यांना संमत असून त्यांचे प्रत्यक्ष पौत्र, ज्यांचें नांव घेण्यास मला लज्जा उत्पन्न होते, त्यांना पसंत नाही. त्यांच्या मनांत ब्रह्मचर्यव्रतानें रहावयाचे आहे. गृहस्थाश्रम स्वीकारावयाचा नाही. शिवाय, ते एकवचनी आहेत. एक अंशी अग्नि आपली दाहकता सोडील, समुद्र आपली मर्यादा सोडील, किंवा पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवेल; पण ते आपला निश्चय फिरविणार नाहीत. ते मनाचे इतके कठोर केवळ पायाणहृदयाचे आहेत की, त्यांनी प्रत्यक्ष आपल्या वृद्ध आजाआजीचा त्याग केला आहे. देवगडावर स्वामी जनार्दनमहाराजांची एकनिष्ठपणे सेवा करीत आहेत. हे त्यांचे करणे ह्मणजे मला असे वाटते की, घरी वृद्ध आईबापांचा त्याग करून एखादा अविचारी उनाड मुलगा ज्याप्रमाणे काशीयात्रेस जातो, आणखी त्याला जितकें पुण्य जोडते, त्याप्रमाणे असून तितकेंच पुण्य यांना जोडणार आहे. एकनाथ-(एकीकडे ) आपण तूर्त इला ओळख देऊ नये.