पान:श्रीएकनाथ.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गूण वेल्हाळा, गूण वेल्हाळा ॥ आह्मीं आज देखिला डोळां ॥३॥ सांब शिव ।। भाळिं अर्ध चंद्र निर्मळ ग ॥ जटेमधून स्रवतसे जळ ग ॥ वर करी छाया शीतळ, नाग तो काळा, नाग तो काळा।। आह्मीं आज देखिला डोळां ॥ ४ ॥ सांब शिव ।। ह्मणे विठू तया देवाचे ग ।। निर्वाण भक्त देशाचे ग ॥ उचलून पायघुळ त्यांची, लाविन कपाळां, लाविन कपाळां ॥ आह्मी आज देखिला डोळां ॥ ५॥ साब शिव ।। अगबाई ! हा बैरागी मोठा तेजःपुंज दिसतो ! कोणी तरी मोठा साधु असावा ! आपण जाऊन नमस्कार करावा. संतांच्या दर्शनाने आपल्या जन्माचे सार्थक होतें असें बाबा मला सांगत असतात. संताचा महिमा देवसुद्धां वर्णन करितात. ( नमस्कार करते.) एकनाथ-पुत्रवती भव. गिरजा-(हंसते ) बिचान्याला काय माहीत की, मी कुमारिका आहे. त्याने आपला चालीप्रमाणे आशीर्वाद दिला. - एकनाथ-तुम्हांला हंसायला काय झाले ? मी कां वाईट आशीर्वाद दिला? गिरजा-तसें नाहीं बुवासाहेब, मी अजून कुमारिका आहे. म्हणून तुमच्या आशीर्वादाचे हंसू आले. एकनाथ-अजून कुमारिका !! तुझ्या वडिलांनी तूं इतकी उपवर झालेली असून अजून तुझें लग्न केले नाही ! मोठे आश्चर्य आहे ! गिरजा-माझ्या देवाची कहाणी फार विचित्र आहे ! (रडते.) एकनाथ-अरेरे ! माझ्या भाषणाने तुह्माला दुःख झाले काय ? मला क्षमा करा. तुमच्या दुःखाचा प्रतिकार माझ्या हातून होण्यासारखा असल्यास मी ताबडतोब करीन. भूतमात्रांवर दया करणे हाच आमचा धर्म आहे. तुझी फार दुर्दैवी कसे झालां !