पान:श्रीएकनाथ.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. Irenslike If you have all the world and all heaven to love you, And that love with its power would you fully convince, Then love all the world; and men royal and true, Will make cry as you pass-God bless him, the Prince ! _RALPH WALDRO TAINE. ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला। तेणें जन खेळकर केला रे॥ जनार्दन बसवंत करुनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।। एकचि घाई खेळता खेळतो । आपणची बसवंत झाला रे ॥ टिपरीचे अभंग-तुकाराम. एकनाथ पूर्ण ज्ञानी ॥ अवतार जाहला प्रतिष्ठानी ॥ द्वादश वर्षे ज्याच्या सदनीं ॥ वाहिले पाणी श्रीकृष्णे ॥ १॥ संतलीलामृत-महिपती. गोपां किति गोपीना नेदी उदकासि आणिकां वडिलां॥ तो एकनाथसदनी गंध उगाळूनि आणि कावडिला ॥ १॥ नाथचरित्र-मोरोपंत. __ ज्याने बाल्यावस्थेंत एकनिष्ठपणे सेवा करून सद्गुरु श्रीजनार्दनस्वामी यांची कृपा संपादन करून ब्रम्हज्ञानाची प्राप्ति करून घेतली; ज्याला भग-Sure वान् श्रीदत्तात्रेय यांनी प्रसन्न होऊन प्रत्यक्ष दर्शन देऊन ज्याच्या मस्तकीं आपला वरदहस्त ठेविला; ज्याच्या घरी प्रत्यक्ष श्रीकृष्णपरमात्म्याने कावडीने पाणी वाहण्याची, उच्छिष्टे काढण्याची, दीपकपंक्ति प्रज्वलित करण्या- Prar ची वगैरे नीचतर कामें केली; ज्या पुण्यपुरुषाने आपले सर्व वित्त व बल यांचा व्यय अंध, पंगु, निराश्रित, व अनाथ लोकांस भोजने घालण्यांत व त्यांचे दुःख निवारण करण्यांतच केला; ज्याला महाराष्ट्रभाषावधूची अ. नास्था व अवहेलना सहन न होऊन ज्याने आपल्या महाराष्ट्र कवित्वाने व वक्तृत्वाने विद्वान मुकुटमणि म्हणविणाऱ्या व गीर्वाण भाषावधूवरच मोर्चलें उडविणाऱ्या काशीक्षेत्रवासी क्रोधावश झालेल्या संन्याशांना व शास्त्रीपंडितांना खाली पहावयास लाविलें; ज्याचे अप्रतिम वक्तृत्व, रसाळ वाणी, गंभीर उपदेश, स्वयंभु काव्य, व आत्मानात्मविचार श्रवण केल्याबरोबर वर्णश्रेष्ठ ब्रम्हवृंद चित्रासारखे तटस्थ होत; ज्याची स्वाभाविक