पान:श्रीएकनाथ.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. गिरजा-(आत्मगत ) माझ्या आशेचा अंकुर पुनः जागृत होत चालला आहे. जनार्दनस्वामीकडे आपण स्वतः जावें, त्यांची सेवा करावी, आणखी मी काय अपराध केला आहे, तो माझा इतका अव्हेर होत आहे, याचे कारण त्यांना विचारावें. चार समजुतीच्या गोष्टी सांगन मन वळवून घरी आणावें. असें कैक वेळां माझ्या मनांत आले. पण लोक मला ह्मणतील मुलगी मोठी ढालगज आहे, फार फाजील आहे. या जनापवादाला भिऊन मी आपली गप बसले. पण आतां देवी रुक्मिणीने ज्याप्रमाणे आपला एकविध भाव ब्राह्मणाच्या रूपाने भगवान् श्रीकृष्णाकडे पाठविला होता, त्याप्रमाणेच हे पुराणीक कार्यभाग शेवटास नेण्याकरितां स्वामीमहाराजांकडे गेले आहेत. माझी पक्की खातरी आहे, की स्वामींचा शब्द व्यर्थ जाणार नाही. (दचकल्यासारखे करून ) अगबाई, बाबा मला हाका मारीत आहेत वाटते. आले हो आलें बाबा. ( जाते ). प्रवेश ४ था. स्थळ-पैठण येथील पिंपळेश्वराचे देवालय. (गोसाव्याच्या वेषाने एकनाथ प्रवेश करतो. गिरजाबाई पूजा करिते.) एकनाथ-(आत्मगत ) याच ठिकाणी प्रथम आकाशवाणी होऊन मी जनार्दनस्वामीकडे गेलो. आकाशवाणीप्रमाणे कार्यभाग होऊन आतां मी परत आलो आहे. ज्या बिल्ववृक्षांच्या खोडांवर मी आकाशवाणीची अक्षरे लिहिली होती ती अक्षरे आतां मुळीच दिसत नाहीत. ती बेलांची झाडें आतां पहिल्यापेक्षा किती तरी मोठी झाली आहेत ! त्यांच्यांत मला केवढा फरक दिसत आहे ! माझ्या वृत्तीतही त्याप्रमाणेच फरक पडला आहे. असो, आपण महाक्षेत्र वाराणशीस जाऊन मनिकर्णिकेचें स्नान करून भगवान विश्वेश्वराचे दर्शन घेतले. मग प्रयागतीर्थी येऊन त्रिवेणीसंगमी स्नान झाले. बिंदुमाधवाचे दर्शन झाले. गयेला जाऊन विष्णुपदाचे दर्शन झाले. मला तर वाटते की, कायावाचामनेकरून जे श्रीविष्णूला