पान:श्रीएकनाथ.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. जन्मभर तुझे उपकार विसरणार नाही. तुला मी कमजास्त बोलल्याबद्दल तूं मला क्षमा कर. आणखी माझा एकनाथ मला आणून भेटीव. पुराणीक-तुझी जरी कमजास्ती बोललां आणखी मला मारिलें, तरी तुह्मी मला वडिलाप्रमाणे आहांत. सहन करण्याचा माझा धर्म आहे. बरें जातों मी आतां. चक्रपाणि-(गिरजाबाई नमस्कार करिते. ) पुराणकिबोवा जरा थांबा. ह्या मुलीचा बाप आज कैक दिवस एकनाथाची वाट पहात बसला आहे. मी त्याला अनेक वेळा सांगितले की, कोटें तरी दुसरीकडे स्थलाची योजना करून कार्यभाग उरकून घे. परंतु तो ह्मणतो की, मला पांडुरंगाचा असा दृष्टांत झाला आहे की, तुमच्याच घरी मुलगी द्यावी. ह्या मुलीने आज कितीएक दिवस उपोषणे चालविली आहेत. सोळा सोमवार करीत असते. रोज पिंपळेश्वराला प्रदक्षिणा चालल्या आहेत. जिवापाड कष्ट करीत आहे. हिच्या बापाकडून शंकराला एकादशनी, लघुरुद्र, महारुद्र यांची आवर्तने चाललेली आहेत. इतके करून अखेर फलप्राप्ति होईल किंवा नाही, याची मला वानवाच दिसते. कारण नाथाच्या मनांत स्वताचे लग्न मुळीच कर्तव्य नाही. आमच्या देखत त्याचे लग्न होऊन आह्मी तो सुखसोहाळा पाहू एवढे आमचे भाग्य दिसत नाही. तात्पर्य हेच की, तुझी स्वामी जनार्दनांना या मुलीची स्थिति कळवा. आणखी आमची विनंति कळवा की, आपण रुपा करून जेणेकरून एकनाथ गृहस्थाश्रम स्वीकारील असा त्याला बोध करा. नाही तर भानुदासाच्या वंशाचें नक्कल झाले ह्मणावयाचे. हे माझे कळकळीचे शब्द त्यांना कळवा. मुली, तुला काय आशीर्वाद देऊ? भगवान् श्रीशंकर तुझें खास कल्याण करील. (पुराणीक जातो.) गाववा-(चक्रपाणीस नमस्कार करितो.) मटले माझ्या लग्नाचें करें जुळल्यास पहा. अनेक नवऱ्या आजपावेतों चालून आल्या. पण मी घोड्यावर असल्याने व मी आपला घोडा नेहमी भरधाव फेंकीत असल्याने बायकोच्या हाती सांपडलो नाही. (त्याची आई त्याला मारीत मारीत पडद्याकडे नेते) नको-मला बायको नको-पोंचली-पोंचली:(चक्रपाणि त्याला सोडविण्याचा प्रयत्न करतो. त्रिवर्ग जातात.) IV