पान:श्रीएकनाथ.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, अंक ३ रा. साऱ्या जगाला माहीत आहे. तुह्मी त्याला मारूं नका. ( चक्रपाणि प्रवेश करितो.) चक्रपाणि-(पुराणीकास ओळखून ) आपण फार शहाणे आहांत. बरे झालें, चोरा सांपडलास. माझा एकनाथ, कोठे पळवून नेलास! का त्याला मारलास का केलेस तरी काय ? दुष्टा, आतां तुला या सोट्याखाली झोडून काढतों समजलास ? (त्याला मारावयास धांवतो) पुराणीक-पण अगोदर मी काय ह्मणतो, तें ऐकून तर घ्या, मग मला मारा. उगाच ब्राह्मणाला जे आहेत तें मारूं नये असें शास्त्र आहे. चक्रपाणि-आग लागो तुझ्या शास्त्राला ! पोरगें माझें नाहीसे केलेंस. काय त्याचा पत्ता काय ? पुराणीक-(कागदपत्र दाखवितो) हे माझे कागद पहा. ही मला लढाईत मिळालेली इनामपत्रे पहा. मी दिल्लीकडे लढाईवर गेर्लो होतो तेथे मला इतके दिवस लागले.. गावबा-(एकीकडे ) बहुतेक लाडूवर लढाई मारली असेल. झुरळाला सुद्धा भितो, आणखी लढाईच्या थापा मारतो आहे. पुराणीक-आतां तुमच्या एकनाथाविषयी म्हणाल तर मला इतकें माहीत आहे की, तो दौलताबादच्या किल्ल्यावर स्वामी जनार्दन यांची सेवा करून ब्रम्हज्ञानाची प्राप्ति करून घेण्याकरिता गेला होता. परंतु अजून तो परत कसा आला नाही, याचे मला मोटें आश्चर्य वाटते. पाहिजे असल्यास मी त्याचा शोध करून येतों आपण अत्यंत दुःखाने व्याकूळ झालां आहां, व आपल्याच्यार्ने आतां पौत्रवियोग में आहेत ते सहन होत नाही. मी एकनाथाला घेऊनच येतो, मग तर झालेंना ? । चक्रपाणि-माझा एकनाथ जिवंत आहे, इतकें तूं सांगितल्याने मला तूं आज त्याची प्रत्यक्ष भेट केल्याप्रमाणेच झा. मेघाने ज्याप्रमाणे चातकासाठी प्रसन्न होऊन अमृताचा पासस पाडावा, अथवा मारवाड देशांत उन्हानें तप्त होऊन तृषित झालेल्यास सुर्वणाची झारी थंडगार पाण्याने ज्याप्रमाणे प्राशन करण्यास द्यावी. त्याप्रमाणे तूं आज मज तृषितावर अमृताचा पाऊस पाडलास. मी