पान:श्रीएकनाथ.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ श्रीएकनाथ. म्हातारी-हा तर माझा गावजी! हा मेल्या बायल्या! आतांशा का बायकांची सोंग घेऊन हिंडत असतोस वाटते ? थू तुझी जिनगानी !! गावला-(सर्वत्रांस नमस्कार करून.) मी तमचा परम अपराधी आहे. कांही जरूरीच्या कामाकरितां मला हा वेष धारण करणे भाग पडले. ह्या वेषाने मी मोठी कामगिरी बजावली आहे. मी केवढा पराक्रम या वेषाने गाजविला आहे तो पुढे मागें जगांत महशूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हातारी-अरे जा मूखां, मी आज पंधरा दिवस झाले तुझा शोध करीत आहे. मेल्याचा पत्ता नाही. मेल्याने लुगडे चोळी माझीच चोरून नेली आहे वाटते. काय मेले कारटें जन्मलान् तें आलें आहे ! सगळी मेली आणखी हें राहिलें ! गावबा-त्यांचा सर्वांचा उद्धार करीन. मग तर झालेंना ? ( पुराणीकास उद्देशून ) जे आहेत तें पुराणीकबुवा, तुझी इतके दिवस कोठे गेला होता? तुमच्याकरितां विधवा बायकांनी जेते कालाचे ठायीं, मोतीचर, जिलबी, बुंदी यांची वायनें सिद्ध करून ठेविली आहेत. ( तोंडास पाणी सुटले आहे असे दाखवितो.) गिरजा- (एकीकडे ) मी याला एक पत्र दिले होते. त्याचे याने काय केले कोण जाणे? हा तर बोलून चालून वेडा. मी व्यर्थ याच्याजवळ पत्र दिले. मला म्हणाला की, अगदी तिकडे हातांत पत्र देईन. ( उघड ) माझ्या पत्रात्रे काय केलेंस ! गावबा घे तुझें पत्र. जसेचे तसे परत आणिलें आहे.. मी त्याची एकांती गांठ घेतली. तुझ्या रूपाची आणखी गुणांची त्याच्याजवळ पुष्कळ वाखाणणी केली. पण काही नाही. शेवटी पत्र दिले, पण त्याने तं वाचलें सुद्धा नाही. त्याने सांगितले मला तुझी गरज नाही. मी साफ लग्न करणार नाही. तुला वाटेल तसे कर.. वाटल्यास दुसरा नवरा कर. पुराणीक-(गावबास मारतो. ) दुसरा नवरा कर ! गावबा, अशी अक्षरें तोंडांतून काढतोस काय ? मातारी-( मोठ्याने ओरडून ) अहो तो वेडा आहे, वेडा आहे.