पान:श्रीएकनाथ.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ४७ गावबा-दुसऱ्याच्या मनामंदी काय चालल हय् ते मला तवाच कळत. मी मनते तस हय् की नाय सांगा. गिरजा-सांग माझ्या मनांत काय चालले आहे ? गाववा-तुमच्या मनामंदी जप चालला हय् जप. हे पघा, एकनाथ नांवाचा जप चालला हय्. आनखी तुमच्या मनामंदी अस हय की, या जन्मीं नाय तर मोरल्या जन्मी, त्या जा नाही तर त्येच्या म्होरल्या, असी सात जन्म कव्हा ना कव्हा तरी त्येची बाईल होईन. समद्या यात्रा पालथ्या घालीन. हात पाय करवतान कापुनशान घेईन. एका पायावर उभ राहूनशान तप करीन. पन त्याची अस्तुरी होईन. आन असा एक कागुद लिहुनशान तुम्ही या बाईच्या मुलासंग दिला हय. त्या कागदाच्या जाबाची तुम्ही वाट पहात आहां. खर की नाइ बोला ? आता तुम्हाला त्या कागदाचा जाब सांगितला आन या बाईचा ऐटदार आन खबसुरत आन इदवान् मुलगा या बाईला आनुनशान दिला, तर मला काय द्याल ? (पुराणीक प्रवेश करितो.) अहाहा ! हे माझ् परानपती आल. पराननाथ, आज कितिंदी झाल तुमच्या भेटीला बर ? (त्याच्या गळ्यास मिठी मारतो.) पराणीक-(पलीकडे लोटून ) शांतं पापं. विष्णवे नमः. कोण ही हडळ बेशरम आहे ! एकदम माझ्या येऊन गळ्याला मिठी मारते. गावबा-आन् मी आपली आवा, आपली परत्यक्ष बायको. तुम्ही जर अस कराया लागला तर तुमच्यावानी येड या जगामंदी कोनी असल का ? हजारा लोकामंदी तुमच माझ्याशी लगीन लागल आन मी चंदरसूर्याला साक्षी ठेवूनशान भवल यंघल. आन तुह्मी माझ लाड पुरवीन म्हनुनशान शपथ खाल्लीया. पराणीक-अग सटवाई, तूं कोण आणखी मी कोण, तुझा माझा काय संबंध ! मी तुला जन्मांत कधी पाहिले नाही. तुझें नांव काय? गावबा-माझ नांव तंगी. मी कानडी हय. आन तुमच नांव यंकोबा. आन आपल उपाध्याच नांव शुक्राचार्य. कां आतां पटली का खुन ? आतां कस काय पराननाथ ? ( गळ्याला मिठी मारतो. पराणीक त्याला फर फर ओढून तोंडावरचा बुरखा बाजूला करतो.)