पान:श्रीएकनाथ.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. गिरजा-सर्व कळले आहे. पण मला नाही वाटत की, काही तरी उपयोग होईल. म्हातारी त्याला कसेंगे समजले. त्याला तूं का पत्र पाठविलेंस होय! गिरजा-कांहीं ह्मणा, पण त्यांना कळलें आहे एवढें खास. बायकाचा वेध घेतलेला गावबा प्रवेश करतो.) गावबा--(रडत रडत ) अहो बाई, माझें पोर कोणी चोरून नेलें कोण जाणे ? म्हातारी केवढेसें तुझें मूल आहे गे बाई ? तूं कुणब्याची आहेस की ब्राह्मणाची ? गावबा--मी व्हय. कुणब्याची है आन् माझा गाववा कसला गुनाचा व्हता ! ( रडतो.) म्हातारी-अग पण रांड. असें पोर टाकून तूं गेली होतीस कोटें शेण खायला ? तुझें तुला पोर संभाळवेना, बायको कशाला झालीस ? गावबा-अंग मला पुरुस व्हताइना. मंग मी म्हटल मी आपली बायकोच व्हते. आतां मला असा मंतर येतो हय की मला वाटल तव्हा मी पुरुष होते, आन वाटल तव्हा बायको होते. आन् बायको झाले की, कोनी तरी माझ पोरग चोरून नेत. पन कायहो बया तुम्हाला एक पोर हृय ना ? म्हातारी-असून आणखी नसून सारखाच. आज पंधरा दिवस झाले, त्याचा पण मेल्याचा पत्ता नाही. त्याचे नांव गावबा आहे. गावबा-तुझी बायको झाला म्हुनशान तुमचा मुलगा कोनीतरी चोरून नेला. तुझी जर पुरुस असता तर तुमचा गाववा कोनीबी नेला नसता. आतां बोलूनशान् काय उपयोग ! आपला दोघीचाबी गाववा चोरून नेला. तुम्ही आम्ही सारख्याच दुःखी आहो. आतां मी जर तुमचा गावबा अनुनशान दिला, तर तुम्ही मला काय द्याल ? मातारी-काय मागशील तें देऊ. गाववा-या बाईचा नवरा, या बाईला मिळवून द्याल ? गिरजा-हें ग बाई तुला कसे कळलें ?