पान:श्रीएकनाथ.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ४५ आहे. सगळ्या पैठणकर ब्राम्हणांना हे कां माहीत नाहा काय ? त्यांना माहीत आहे, म्हणूनच ते आजपर्यंत स्वस्थ बसले आहेत. नाही तर त्यांनी माझ्या बापास कधीच वाळीत टाकले असते. मातारी-पण कायगे गिरजा, तूं त्या दिवशी जीव काय ह्मणून दिलास ? मग नदीत बुडाल्यावर तुला कसे वाटले गे! त्या दिवशी तूं फारच मोठे धाडस केलेसहो. शाबास तुझी! तुला काय वाटले की, एकनाथ आपला आटपला म्हणून हो ? गिरजा-प्रथम माझ्या सावत्र आईने मला अशी खोटी बातमी सांगितली की,-मी निजलें होतें-मला जागे करून ह्मणाली-बैस आतां जन्मभर हाका मारीत. आमी जें जें स्थळ तुला जळवितों, तेथें तेथें कांहींना काही तरी प्रतिकूल होतेच होते. या ठिकाणी तर आता कळसच झाला. प्रत्यक्ष नवरामुलगाच नदीत पडून बुडून मेला असें म्हणतात. कोणी म्हणतात, त्याने आत्महत्या केली. आतां तर तुला कोणीच पतकरणार नाही. त्याच्यापेक्षां तूंच मेली असतीस तर उत्तम झाले असतें.माझ्यासारखी असती, तर नदीत जाऊन जीव दिला असता. अशा तिच्या मर्मभेदक भाषणाने मी फारच संतापलें, व मला तरी आतां ज्यांच्या नांवावर मी विकली जात आहे, त्यांच्यामागें जगून काय करायचे आहे, असें मनांत येऊन मी बाई जीव दिला. त्याच वेळी मी मेलें असते, तर किती उत्तम झाले असते ! पण माझ्या नशीबी आणखी अनेक दुःखें भोगावयाची आहेत. ती पूर्णपणे भोगल्याशिवाय मला मरण येणार कोठून ! ज्या कोज्यांनी मला बाहेर काढून अनेक उपाय करून जिवंत केले, त्या कोळ्यांना माझ्या बापाने दोनशे रुपये बक्षीस म्हणून दिले ! - म्हातारी–पण कायगे, तूं जो जीव दिलास तो एकनाथासाठी दिलास का आईच्या जाचासाठी दिलास ? गिरजा-आई कांही मला खात नव्हती, कांही गिळीत नव्हती. ज्यांच्याकरतां मला जगावयाचे ते नाहीत, असे पाहिल्याबरोबर जीव दिला. म्हातारी--पण ज्याच्याकरितां जीव दिलास त्याला तूं जीव दिल्याचे समजले तरी का ?