पान:श्रीएकनाथ.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ श्रीएकनाथ. - - गिरजा-तुझी आपल्या नशीबाला इतक्या रडतां, आणखी । मी काय करावे ? आईबापाला पांडुरंगाचा दृष्टांत झाला की, चक्रपाणीच्या घरी मला द्यावी ह्मणून. आतां मला चौदावें सरून पंधरावे लागण्याचे दिवस आले. लोकांच्या मुली माझी चेष्टा करतात. मला पाहिले झणजे रस्त्यांतील बायका नाक मुरडतात. केवढी घोडनवरी झाली ह्मणतात. आतां मी आपल्या नशीबाला कसे करावे? म्हातारी-ह्मणजे, मला हे आश्चर्य वाटते की, तुझा बाप इतका श्रीमंत असून तुला अजून स्थळ मिळू नये, ह्मणजे मोठे आश्चर्य आहे! गिरजा-मी आठ वर्षांची झाल्यापासून माझ्या वडिलास दृष्टांत होत आहेत की,मला चक्रपाणीच्या घरी अमक्या अमक्याला द्यावी. बरें, इकडे चक्रपाणि आणखी सरस्वती काकू यांनी लग्नाची तयारी आहे ह्मणून सांगितले. छत्तीस गुण उतरले. पण ज्यांचे लग्न व्हायचे ते कुठे लग्न करण्याला कबूल आहेत ? मला साफ लग्नच कर्तव्य नाही, ह्मणून हजार वेळां निक्षून सांगणे झाले. बरें, माझ्या बापानें कोठें दुसरीकडे स्थळ जुळविण्याचा प्रयत्न केला की, लागलीच वरपक्षाकडचे कोणी तरी मरून प्रतिकूल झाले, म्हणून एकच गवगवा होतो. शिवाय माझ्या बापाला स्वप्ने पडतच असतात की, तूं कांहीं काळजी करूं नको. तुझी मुलगी भानुदासाच्या वंशांतच पडणार आहे. तं स्वस्थ अस. म्हातारी-आतां काय बाई करावें ? आतां किनई पैठणकर धर्माधिकारी तुझ्या बापाला वाळीत टाकतील बरें का ? तूं आपल्या बापाला दुसरीकडे द्यायला सांग. नाहीतर तुझा बाप चांगला श्रीमंत आहे, मग माझ्या गावबाला करीना घरजावई ? गिरजा-तें काय ह्मणून ? जर माझे लग्न झाले नाही, तर मी आपली जन्मभर वेगळी राहून देवाची सेवा करीन. आईबाप वेगळे राहतील. मग तर त्यांना कोणी वाळीत टाकणार नाहींना ? माझा तर हा निश्चय कधीपासूनच झाला आहे. मी आठ वर्षांची असतांना मला देऊ केलेली आहे. आणखी चक्रपाणि यांनी माझ्या बापास तुमची मुलगी आम्ही आपल्या घरी करून घेऊ म्हणून वचन दिलेलें