पान:श्रीएकनाथ.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ४३ स्थूळ प्रविविक्त सुख चौथें आनंदाभासवो ॥ पिंड ब्रह्मांड आणीक तूं ओंकाराचे सुखवो ॥ त्वंपद तत्पद आणिक अ. सिपद ते तूं एकवो ॥४॥आजी पंचका कारण पडू चक्राचें भेदनवो ॥ मंत्र तंत्र स्थानी अनावराचे आवरणवो ॥ नसोनी एकपणी एकाएकी जनार्दनवो॥ ५॥ (दोघे दोन्ही बाजूंनी पडद्यांत जातात.) प्रवेश ३ रा. स्थळ-पैठण येथील पिंपळेश्वराचे देवालय. (गिरजाबाई व एक म्हातारी प्रवेश करिते.) म्हातारी-देवा देरे पुत्र आणखी देवाने दिले कुत्रे. दहा बारा मुलें मला झाली. त्यांत हा एकटा कायतो मागे राहिला. बाकीची सगळी मेल्या देवाने नेली. बरें, हा तरी एवढा चांगला शहाणासुरता निघेल मटले, कांहीं नांवलौकिक मिळवील, म्हातारपणी संभाळील, हातपाय जाणील, पण तें कांही नाही. तुकडा खातो आणी भटकत फिरतो. सर्व मुलांची रामा, रुष्णा, गोविंदा, गोपाळा, गंगा, यमुना, सरस्वती, भागीरथी अशी जरी नांवें ठेविली होती, तरी कोणाला पोटांतलें, कोणाला देवी, कोणाला गोवर, कोणाला अफू जास्त, कोणी सटावलें, कोणी माडीवरून पडलें, काही तरी होऊन एकामागून एक वर्षाचे, दोन वर्षांचें, तीन वर्षांचें, चार वर्षांचे असें होऊन मेलें. शेवटी हा दाणा मुलगा जन्माला आला. याचे मग बारसें केलें नाहीं, आणखी नावही पण ठेविले नाही. कोणी नांव काय ह्मणून विचारले, तर सांगते की, गावबा. मुलगा बापाच्या मुळावर. दिवस राहिले मात्र. तो बापाला गिळलाच होता मेल्याने. पण मग शांत केली, तेव्हां ते दुखण्यांतून उठले. कधी शाळेत गेला नाही. ठोंब्याला एक अक्षर मुद्धां लिहितां वाचतां येत नाही. आतां आह्मी मेल्यावर याला खायला कोण घालील, याची मला रात्रंदिवस काळजी पडली आहे.