पान:श्रीएकनाथ.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ श्रीएकनाथ. कांहीं नको. मी येथेच आपलें उच्छिष्ट भक्षण करून मोठ्या आनंदाने राहीन. आपण माझा असा त्याग करू नये. आईने बालकाचा याग केला तर त्या बालकानें कोणीकडे जावें ? जनार्दन०-एकनाथा, तूं आतां भगवान दत्तात्रेय यांची आज्ञा काय बरें ऐकली आहेस ? ती आपण उभयतांनी मान्य केलीच पाहिजे. त्यांत आपले सर्व प्रकारे कल्याण होणार आहे. तूं आतां जा. मी तुला निरोप देतो. शेवटी तुला इतकेंच सांगतों की:-- अभंग. आलिया अतीथा द्यावें अन्नदान ॥ याहुनी साधन आणीक नाहीं ॥१॥ ज्ञातीसी कारण नाहीं पैं तत्वतां ॥ असो मैं भलता अन्न द्यावें ॥२॥ अन्न परब्रह्म वेदांती विचार ॥ साधी हाची निर्धार प्रेमतत्वें ॥३॥ ह्मणे जनार्दन यापरतें आणिक ॥ नाहों दुजें देख एकनाथा ॥४॥ अभंग. सर्वांभूती भाव नको ठेऊ दुजा ॥ तेणें गरुढध्वजा समाधान ॥१॥ संतासी नमन आलिया अन्नदान ॥ यापरते कारण आणिक नाहीं ॥२॥ सर्व भावें वारी पंढरीची करी ॥ आणिक व्यापारी गुंतूं नको ॥३॥ ह्मणे जनार्दन घेई हाचि बोध ॥ सांडोनी सर्वदा द्वेष भेद ॥४॥ एकनाथ अभंग. जय जय वो जनार्दने ॥ विश्वव्यापक संपूर्णवो। सगुण अगुण विगुण ।। पूर्ण पूर्णानंदधनवो ॥१॥ ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासूनीवो ।। गुणत्रय उभयवनीं तूंची पंचक अंतःकरणीं वो ॥ व्यापुनी पंचकप्राण दशइंद्रिय करणीवो ॥ पंचक विषयस्थाने पंचविषयांचे स्वामिनीवो ॥२॥ स्थूळ लिंग कारण चौथे महाकारणवो।। जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनी हे स्थानवो। नेत्र कंठ हृदय मूर्ती या प्रमाणवो ॥ विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा तूं संपूर्णवो ॥३॥