पान:श्रीएकनाथ.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. एकनाथ पद. 10 दत्तगुरु दत्तगुरु दत्तात्रय गुरु हो ! ॥ ध्रुवपद ॥ आदिनाथ दिनानाथ ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥१॥ शंखचक्रगदाधरा ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥२॥ उमापते ! रमापते ! ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥३॥ पूर्णब्रह्म सनातन ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥४॥ अनसूया वरदपुत्र ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥५॥ भक्तकाम कल्पद्रुम ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥६॥ सच्चित् अति सुखसागर ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥७॥ निरंजन निराधार ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥८॥ निर्विकल्प चित्प्रकाश ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥९॥ सर्वांठायीं सदोदित ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥ १० ॥ एका जनार्दनीं दत्त ब्रह्मरूप ॥ दत्तगुरु ॥ ११ ॥ ( मलंग औदुंबराच्या वृक्षांत नाहीसा होतो.) जनार्दन०-एकनाथ, आकाशवाणीप्रमाणे तुला ब्रम्हज्ञान व त्याचप्रमाणे श्रीदत्तदर्शन ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. आतां तूं तीर्थयात्रा करून भगवंताने सांगितल्याप्रमाणे पैठणास जा. आपल्या वृद्ध आजाआजीची सेवा कर. एकनाथ-हा काळपर्यंत मी आनंदाच्या शिखरावर जाऊन बसलो होतो. परंतु आतां स्वामीचा वियोग होणार, ही कल्पना मनांत आल्याबरोबर माझा कंठ भरून आला. आजपावेतों ज्यांनी मला अत्यंत ममतेने वागवून माझ्या जन्माचे सार्थक केलें, ते मला माझ्या प्रत्यक्ष पित्यापेक्षा अधिक प्रिय आहेत. माझ्याने हा वियोग सहन होत नाही. (जनार्दनस्वामीचे पोटांत डोके घालतो.) जनार्दन-एकनाथ, अरे तूं रडतोस? मी प्रत्यक्ष तुझ्या हृदयांत आहे. तूं तर माझा जीवप्राण, आणखी मी तुझा आत्मा. तं आणि मी यांत द्वैताद्वैत भेदाभेद काय उरला आहे तो सांग बरें ? एकनाथ-कसेंही करा, परंतु मला हे चरण सोडून लावू नका. मला तीर्थयात्रा नको. मला आजाआजी नको. आपल्या सेवेशिवाय