पान:श्रीएकनाथ.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. क देव भागवत महज्बूका बडीजाव करनेकेवास्ते अदमीयोंके नसे ह्यां आया हय्. जनार्दनका चेला बनके वास्ते मेरे मुलाकातके ह्यां आकर बैठा हय्. अच्छा, बड़ी खुषीकी बात हय. ( जनार्दनस्वामी कुत्रीचे दूध आणतात. त्यांत शिळ्या भाकरीचे तुकडे कुसकरतात. उभयतां मोठ्या प्रीतीने खातात.) एकनाथ-मोठ्या आनंदाने एकमेकांच्या आत्मज्ञानाच्या गोष्टी चालल्या आहेत. खात आहेत. मिटक्या मारीत आहेत. दुधाचे भुरके मारीत आहेत. त्यांतलें उष्टें प्रसाद म्हणून मला थोडेसें मिळेल तर मी आपल्याला फार भाग्यवान समजेन. गुरूचें उप्टें, हीच गंगा, हेच अमृत. यांत मुख्य गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी ही आहे की, दत्तात्रेयांनी यवनवेष धारण केला आहे. भाषा यवनाचीच वापरीत आहेत. यावरून परमेश्वराच्या घरी सर्व जाति आणि सर्व भाषा सारख्याच मानिल्या जातात. तेथें भेदाभेद मुळीच नाही. ( जनार्दनस्वामी एकनाथास श्रीदत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेवण्यास मचना करितात. तसे करण्यास तो भितो, हे पाहून आपण स्वतः त्याला धरून त्याचे मस्तक दत्ताचे चरणावर ठेवितात. जनार्दनस्वामी त्यास कटोरा धवन आणावयास सांगतात. त्यांतील हात धुतलेले पाणी प्रसाद मान एकनाथ पितो.) मलंग-(एकनाथास जवळ घेऊन मस्तकावर हात ठेवितो. मुख कुरवाळितो.) तेरा भला हो जाएगा. जिस कामके वास्ते, तं ये दनियेमे पैदा हुवा हय् वो काम तेरे हातसे खामखा होजायगा. रामायन के उपर और भागवतके उपर बडी बडी किताबे तयार करेगा. सिवाय इसके किसनजीके शादीका बयान करेगा. और हाजारो हजार कबीतू जिसे अभंग कहलाते हय् वो बनावेगा. तेरे मकानमे सब देव मानिंद गुलामके काम करेगे. और तू बडा साई बनजायगा. जनार्दन, आबू इसकू पैठनकू फौरन् जाने दे. चूं के इसके जडेआमजद चक्रपानी, और उसकी बुढी औरत् इसकी रहा रात दिन देखते हयू. ये अगर न गया तो जल्दी खतम होजागये. शिवाय उन्के रुखसतसे ये ह्यां आया हयू. और वो इसके तालाषके लिये घुमते हय.. खैर जबतक चांद और आफताब ह तबतक इसका नाम दूनीयम कायम रहेगा. आब मैय् चले जाता हूं.