पान:श्रीएकनाथ.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ३९ स्वरूप हैं ॥१॥ चहु समाधीचे पाही हे देखणें ॥ विकळतां तेणे सहजी व्हावी ॥२॥ जिकडे पाहतां तिकडे स्वरूपचि दिसे ॥ तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥ मसूरप्रमाण शून्य महा ते कारण ।। गुरुमुखें खुण जाणिली पें ॥४॥ साचार स्वरूपाची मेळवणी केली ॥ परात्पर ठेली हेची ज्योती ॥५॥ त्याच वस्तुसाठी भांडती पुराणें ॥ वेदशास्त्रे तेथें मौनावलीं ॥६॥ गुह्य हे पंचक देखोनी समाधी ॥ बोलोनीया वेदी निश्चयो केला ॥७॥ एका जनार्दनीं स्वरूप उरलें पाहीं ॥ द्वैत गेलें पायीं सद्गुरूच्या ॥८॥ (औदुंबरांतून कडकड ध्वनि होऊन श्री दत्तात्रेय मलंगाच्या वेषाने सर्वांग चीने वेष्टित आहे, एका हातांत नग्न तलवार, एका हातांत तिरकमटा, मस्तकावर मोराच्या पिसाऱ्याचा टोप, नेत्र आरक्त, व ज्याचें शरीर कृष्णवर्ण आहे, असे प्रकट होतात. बरोबर एक भयंकर कुत्रीही प्रवेश करते.) अरे बापरे ! माझ्या पोटांत तर धडकी भरली ! किती भयंकर ही स्वारी ! पण स्वामींनी मला मघांच सांगून ठेविलें आहे की, तुला भिण्याचे अगदी कारण नाही. मलंग-(जनार्दनस्वामीस प्रीतीने जवळ घेऊन ) जनार्दन, संत और देव इन्मे तफावत् नहीं. संतकू मिलनेके वास्ते मुजे बहोत खुषी होती हय्. जब मय् उनकू मिलता तब मेरा कलीजा उनके मोहबूतसे बहोत थंडा होता हय् उनकू मय् आपने तखतके ऊपर बिठाथा. और उनकी पूजा करता. नारद, वसिष्ठ, वालू मिक, बिभीषन, हनुमान, धर्मार्जुन, उद्धव, अकूर, गोपी, गोप, निवृति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चोखा महार, कबीर, कमाल, ये सबू हमारे देव हय्. जो मेरी याद करता, और जो खता और गुन्हेमे गिरफतार नही वो मेरा अल्ला. खैर अब ये कटोरीमे ये कुत्तीका दध निकालू. फिर आव् दोनो मिलके उसमे रोटी खायेंगे. जनार्दन०--जी हुकम्. बंदा सो दफे तौबा करता, और आपने कुमुरकी माफी मंगता. अबी ये अम्माका दूध निकालताहं. ( दतात्रेय इकडे तिकडे हिंडतात. जनार्दनस्वामी कुत्रीचें दूध काढतात.) मलंग---(एकनाथाकडेस पाहून ) हमारे जो देव हय् उस्मेसे