पान:श्रीएकनाथ.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. ना टाकुनी द्यावी ॥ तेणांचे व्यावीं समाधिमुखें ॥ ८॥ एक चक्र येती आभासा येव्हढी ॥ त्यामधे चौकडी मोतीयाची ॥९॥ मनी रत्नज्योती संध्याकाळी वाती ॥ तेलाविण दीप्ति पाजळती ॥१०॥ ह्मणे जनार्दन एकनाथा घेई ॥ शोधी याची देहीं समाधिमुख ॥११॥ अभंग. देहाची समाधि घ्यावी तीन वेळां ॥ आपुली जीवनकका साधावी पैं ॥१॥ क ी घालोनी बोटे अंगोठ्या नयन तगटे ॥ विकाश सुभटे शुभ्रवर्ण ॥२॥ तयाचें हें नाम बिंब जीवदशा ॥ तेणें रूपदशा मारुनी येती ॥३॥ तितुक्यामध्ये भाव न सोडी समाधि ॥ त्याचे पुढे शोधी गुरुपुत्रा ॥४॥ स्वामीनें पुशिले कैसें काय जालें ॥ आत्मरूप पाहि लें कैशापरी ॥ ५॥ शिष्य ह्मणे स्वामी धरितां कान डोळे ॥ एकाएकी उमाळे आदित्याचें ॥६॥ विकसिले निर्मळ जैसा चंद्र दिसे ॥ येणे न्यायें प्रकाशे आत्माराम ॥ ७ ॥ ह्मणे जनार्दन नव्हे एकनाथा ॥ समाधि पाहतां आळस केला॥८॥ अभंग. मन एकाग्र प्रतीति निश्चळ मध्यरात्रीं ॥ गुरुखुण एकांती रिघत जाय ॥१॥ हंस अंगीचा डोळा विकासुनी कमळ ।। तयाचीये स्थळा हेरीत जाये ॥२॥ चिन्मय अविनाश प्रगटती ज्योती ॥ तोचि प्राणनाथी या देहाचा ॥३॥ त्यापुढे अभ्यास दिसे निवळपणे ॥ तैसे रुप जाणे विराटाचें ॥४॥ ब्रह्मांडी जे असे तेंची पिंडी दिसे ॥ बोलायाचा भास नाहीं पुढें ॥५॥ त्यापुढे समाधि दुजी सांगे कोण ॥ त्या होय पतन निश्चयो वेदीं॥६॥ ह्मणे जनार्दन एकनाथा पाही।।' हेचि भरुनी घेई ओहं सोहं ॥७॥ (जनार्दन स्वामी समाधि लावितात.) एकनाथः अभंग चारमुद्रा आणि समाधी त्या चारी ॥ दिसती चक्राकारी