पान:श्रीएकनाथ.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. बटु ब्रम्हचारी, काय वाटेल त्या स्वरूपाने दर्शन देतात. आतां आज कोणता वेष धारण करून येतात हे सांगवत नाही; परंतु इतकें मात्र लक्षात ठेव की, कसलाही रौद्ररूपी वेष धारण केला, तरी तुला भि ण्याचे कारण नाही. तूं आतां या आंब्याच्या झाडाखाली स्वस्थ बस, आणि मी तुला पाचारण केले म्हणजे तूं आह्मांजवळ ये. एकनाथ-जशी महाराजांची आज्ञा असेल तसे करतों. ( एकीकडे ) आज माझा भाग्योदय खास होणार ! आपल्या सर्व आयण्यक्रमांत ज्या दिवशी परमेश्वर आपल्यापुढे प्रत्यक्ष दर्शन देण्यास येऊन उभा राहतो, तो दिवस खरोखरच सोन्याचा. त्या दिवसाची थोरवी केवढी ! वास्तविक झटले, तर जनार्दनस्वामी आणि दत्तात्रेय भिन्न स्वरूप का आहेत ? एक सगण आहेत, एक निर्गुण आहेत. सूर्य आणि त्याची प्रभा, पारिजातकाचे पुष्प आणि त्याचा सुवास, वाद्य आणि त्याचा नाद, अमृत आणि त्याचा स्वाद, हीं भिन्न करता येतील काय ? आज माझ्या गुरुमहाराजांनी माझ्याकरितां कल्पतरूची उद्यानभूमिका निर्माण केली. चिंतामणीचे पर्वत निर्माण केले. सप्त समुद्र अमृताने भरले. स्वामीचे उपकार मी पामराने काय फेडावे ? सर्व पृथ्वीचे पृथ्वी बावनकशी सुवर्णाची मला पारितोषिक म्हणून दिली ! जनार्दनस्वामी-एकनाथ या प्रसंगी देहाची समाधि कशी की लावावी, हे तुला सांगतो. याच्याकडेस लक्ष दे. अभंग. उदय समाधी लागती निवळ ॥ अवघा ब्रह्मगोळ निखळ तो ॥१॥ चक्रामध्ये चक्र येती व्योमाकार ॥ आदि मध्य हेर ज्योती त्याची ॥२॥ द्वितीय समाधि लागे कैशापरी ॥ गुरुपुत्रा हेरी नयनरुपें ॥३॥ प्रथम समाधी निबिड सर्पकार ॥ त्यामध्ये आकार चकाचा पैं ॥४॥ झळकती मनीं दिव्यरत्न खाणी ॥ अविनाश देखणी चिन्मयाची ॥ ५॥ उदयाची ज्योती द्वितीयेमनीं ॥ ही दोन्ही देखणी झाली बापा ॥ ६॥ उदयाचे तिन्ही द्वितीयेचे तिन्ही ॥ अविदा देखोनिीं ॥ ७ ॥ संध्याकाळी संदेह भाव