पान:श्रीएकनाथ.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक ३रा. ३५ अवलोकन करावे, कोणाविषयी विषम भाव मनांत ठेवू नये, ह्मणजे तं स्वतः बम्ह होशील. आज फाल्गुन शुद्ध षष्ठी आहे. आज तुला भागवत धर्माचे महत्व अति संक्षिप्त रीतीने सांगतो. (“रामकृष्ण हरि" हा मंत्र सांगतो. मस्तकावर हात ठेवतो.)आतां तुझ्या चित्तास कसे वाटते? एकनाथ–प्रथम तर मला असे वाटते की, या हृदयरूप कमकांत श्रीगुरूच्या मूर्तीची स्थापना करून तिला निरंतर ध्यानामृताचा अभिषेक करावा. बोधरूप सूर्याचा उदय झाला त्यामुळे बुद्विरूप परडीत सात्विक भावाची कमळपुष्पें भरून श्रीगुरूला लाखोली वाहावी. प्रातःकाळी, मध्यान्हकाळी आणि सायंकाळी जीवदशारूप धूप जाळावा. ज्ञानदीपाने ओवाळावें. ऐक्यभावाची पाकसिद्धि करून नैवेद्य अर्पण करावा. ही माझी शरीररूपी माती श्रीगुरूचे चरण जेथें उभे राहतील, त्या भूमीत मिसळून द्यावी. माझे स्वामी आनंदाने ज्या पाण्याला स्पर्श करतील, त्या पाण्यांत ह्या शरीरातील पाणी एकरूप करावें. इतके करून मी स्वामीचा उतराई होणार नाहींच असे मला वाटते. आज स्वा-n. मीनी रुपाळ होऊन ब्रह्मविद्येच्या परम गुप्त भांडाराच्या किल्ल्या माझ्या हाती दिल्या. आतां ही पिशाच्च लिपी आजपासून लिहिणार नाही. ही लेखणी श्रीगुरुचरणी अर्पण करतो.( लेखणी स्वामीचरणीं अर्पण करून हात जोडून ह्मणतो. ) अभंग. त्रैलोक्याचा स्वामी जनार्दन ॥केला व्यापार त्यापासून ॥१॥ मोठा लागला व्यापार ॥ राम नाम निरंतर ॥२॥ सोहं कर्जखत दिलें ॥ ते म्यां मस्तकी वंदिले ॥३॥ महा प्रेमाची वस्त्रे दिधलीं ॥ निज मुक्तपणे प्राप्त जालीं ॥४॥ अनुभवाची तहसील समस्त ॥ स्वामीस करुणा पाठविल रिस्त ॥५॥ धर्म खर्डीजमा ॥ खौँ घातले पूर्वकर्मा ॥६॥संतासंगें वसुलबाकी ॥ भक्ताहूनी अति नेटकी ॥७॥ कैवल्यपुरी बांधले तोरण । चतन्य चावडी बैसलों जाण ॥ ८॥ ऐसा व्यापार सिद्ध झाला ।। एका जनार्दनीं केला ॥९॥ (स्वामीस साष्टांग नमस्कार घालतो. स्वामी त्यास आलिंगन देतात.)