पान:श्रीएकनाथ.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. देव तुझ्यापुढे येऊन उभा राहील. एकनाथ, तुझी एकनिष्ठ सेवा पाहून मी फार संतुष्ट झालो. भागवतधर्माचा उपदेश ग्रहण करण्यास तुझ्या अंगी पूर्ण पात्रता आली आहे. ॥श्लोक ॥ कायेनवाचामनसेंद्रियबद्ध्यात्मनावाऽनुसृतस्वभावात्॥ करोति यद्यत्सकलंपरस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥१॥ सकाम बुद्धीने केलेली अथवा निष्काम बुद्धीने केलेली सर्व कर्मे ईश्वरास अर्पण कर. उदकावर तरंग उत्पन्न होतात, परंतु ते उदकापासून भिन्न नसतात; अथवा बुद्धिबळाच्या खेळांत असणारे राजा, प्रधान, हत्ती,घोडे आणि पायदळ जशी सर्व लांकडेच त्याप्रमाणे आपले सर्व संकल्पविकल्प भगवद्रूप ठेवावे. तात्पर्य, हा भागवतधर्म ह्मणजे भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांच्यापेक्षा फक्त भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ भाव धरणाराला अत्यंत सोपा आहे. हा फार श्रेष्ठ आहे. याच्या श्रवणाने अथवा पठणाने अथवा ध्यानानें मनुष्य भवसागर सहज तरून जाईल. भागवत धर्माचे आचरण केल्याने फक्त । भक्तच तरतो असें नाही. तर जो देवद्रोही असेल, अथवा विश्वद्रोही असेल, तोही पण तरतो. भागवत धर्म हृदयांत धरला असतां कर्माकमाचे खंडन होते. निंदा, द्वेष, क्रोध, अधर्म, अविद्या यांचे निर्मूलन होतें. असा भागवतांत श्रीनारद मुनीनी भगवान् कृष्ण परमात्मा याचा -पिता जो वसुदेव याला उपदेश केलेला आहे. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अथवा वेदशास्त्रव्युत्पत्ति हे सर्व गहन मार्ग अज्ञजनाला काय होत ? ह्मणून जडमूढ केवळ पशु, उदाहरणार्थ, गजेंद्र किंवा रामावतारी वानरगण अथवा विवरांत बसणारी जांबुवती अस्वलीण ही भागवत धर्मानेंच तरली. जाति, कूळ, गोत, उंच, नीच वगरे कांहीं भेदाभेद येथे नाही. निष्काम भक्ति करण्याचा जसा ३ अधिकार अत्युच्च बाम्हणास आहे, तसाच महारास आहे. चोखा मेळ्यास जसा विठोबाचा साक्षात्कार होता, त्याचा गंध देखील त्यावेळच्या कर्मठ बाम्हणांस लागलेला नव्हता. सारांश देवाच्या घरी भक्तीचे प्राधान्य आहे, जातीचें नाहीं हे लक्षात ठेव. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे. सर्वांना समदृष्टीने