पान:श्रीएकनाथ.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. ३३ कोठे नजरेस पडत नाही. जमेकडची बेरीज आणि खर्चाकडची बेरीज यांचा एक मेळ बसत नाही. पाव आण्याची चूक ज्याअर्थी मिळत नाही त्या अर्थी श्रीगुरूची सेवा आपल्या हातून पूर्णपणे घडत नाहीं हेच खरें; नाही तर असे झाले नसते. माझ्या प्रामाणिकपणास आणि स्वामीसेवेस कालिमा लागली. यांत कांही संशय नाही. कोट्यवधि रुपायांच्या घडामोडी माझ्या हातून झाल्या, परंतु आतां अभ्युदय होण्याची वेळा, आणि हिशोबांत पाव आण्याची चक, हे कांहीं बरोबर नाही. जय श्रीगुरुमहाराज एवढी पाव आण्याची चूक सांपडून द्याहो ! एकदां बेरीज तपासतों. ( जनार्दनस्वामी प्रवेश करितात.) जनार्दन-अरे हा अजून जागाच आहे ! हा इतका हिशेबांत चूर कसा झाला आहे ! मघांपासून मी याच्याकडे नजर देऊन पहात आहे; हा अगदी गुंग होऊन गेला आहे. आतां पहाट होण्याची वेळा आली. बसून बसून कंबरेला कळ लागली असेल ! डोळे किती लाल झाले आहेत ! हा इतका निमग्न झाला आहे की, मी याच्या इतक्याजवळ जाऊन उभा राहिलों आहे, तरी याच्या लक्षात येत नाही. (एकनाथ मोठ्याने टाळ्या वाजवितो. मांडीवर थाप मारतो, ) मला पाहिल्याबरोबर जो नम्रपणे हात जोडून उभा रहावयाचा, तो आज आनंदाच्या भरांत टाळ्या पिटतो आहे. इतका आनंद तरी याला कशाचा झाला आहे ! ( उघड ) एकनाथ, कशाचारे इतका आनंद तुला झाला आहे ? का ब्रह्मानंदी निमग्न झालास ! एकनाथ—( नम्रपणे ) आपल्या आज्ञेप्रमाणे हिशेब तयार ठेवीत असतां एक पाव आण्याची चूक काही केल्या सांपडेना. चित्तांत फार खेद उत्पन्न झाला. वाटले की, स्वामीचा मजवर रोष होईल. तीन दिवस अहोरात्र जागरणे करून हिशेब तपासला, परंतु चूक सांपडली नाही. आता इतक्यांतच चूक सांपडली ! फार आनंद झाला. दुसरे काही नाही. जनार्दनस्वामी-पाव आण्याची चूक काढण्याकरितां जसें तूं एकाग्रचित्त केलेंस तसें एकाग्र चित्त भगवंताकडे लावलेंस तर