पान:श्रीएकनाथ.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक तिसरा. प्रवेश १ ला. स्थळ-देवगडचा किल्ला. [ एकनाथ हिशेब तपाशीत बसला आहे. ] एकनाथ-( आत्मगत ) ज्याप्रमाणे अल्पोदकीचा मासा महासागरांत यावा किंवा जन्मांधाला दृष्टि प्राप्त व्हावी किंवा भिकाऱ्याला इंद्रपद प्राप्त व्हावे, तसे मला स्वामी जनार्दनाचे पाय प्राप्त झाले आहेत. या जगांत दैवी संपत्तीने भाग्यवान् व्हावे, अशी ज्याची इच्छा असेल त्याची जन्मभूमि गुरुसेवा होय. ही सेवा शोकग्रस्तांना ब्रह्म करून सोडते. सकल जलाचा साठा घेऊन गंगा ज्याप्रमाणे समुद्रास मिळते किंवा श्रुति ज्याप्रमाणे ब्रह्मपदांत प्रविष्ट होतात, किंवा सकल गुणालंकारासहवर्तमान पंचप्राण ज्याप्रमाणे पतिव्रता भ्रतारास अर्पण करते, त्याप्रमाणे अंतरबाट सर्वस्व मी श्रीगुरूला अर्पण करतो. विरहिणी स्त्रीचा पति ज्या देशांत असतो, तो देश जसा रात्रंदिवस तिच्या ध्यानी मनी दिसतो, त्याप्रमाणे गुरूचा आश्रम माझ्या ध्यानी मनी दिसो. गुरूचेठायीं असणाऱ्या प्रेमाने मी वेडा होऊन जावो. गुरूच्या वियोगाचे एक निमिष मला युगाहून थोर वाटो. गुरूच्या गांवाहन कोणी आले किंवा गुरूंनी कोणा धाडिलं, तर मरणोन्मुखाला जीव आल्याप्रमाणे किंवा सुकून चाललेल्या मोडावर अमृतधारा पडावी त्याप्रमाणे, नाही तर रंकाला ठेवा दृष्टीस पडावा त्याप्रमाणे मला आनंद होवो. असो, गुरुस्तुति कितीही केली, तरी तृप्ति होणार नाही. आपल्यास श्रीगुरूंनी सर्व हिशेब तयार ठेवण्यास सांगितले आहे. हिशेब सर्व तयार आहे.. एक पावआण्याची चूक लागली आहे. ती सांपडावी ह्मणून आज तीन दिवस अहोरात्र जागरणे करून झटपटतों आहे, पण ती काही सांपडत नाही. आता काय करावें ! दहा वेळ हिशेब तपासला, पण ती