पान:श्रीएकनाथ.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. २१ देसपांडेकू हुकूम् किर्या हय्. और हुकम् की तामिली अबीके अबी होना चाहीये. एकनाथ-बादशहाके हुकूम्की तामिली बिलूफेल् बजा लायंगे. आप चले जाईये. और बादशहाको मारुजा स्वामीके तरफूसे ऐसा करनाके आब बेफिक्र रहिना. टुण्मन्कू गिरफ्तार करके आपके कम् बोसीके लिके मौजूद करताह. जासूद-आदाब अर्ज, मय् इजाजत् लेताहूं (सलाम करून जातो) एकनाथ-(आत्मगत ) या समयीं माझी स्थिति अत्यंत भयंकर आहे. स्वामीमहाराजांची समाधी लागली आहे. ती दोनप्रहरानंतर उतरणार. तोपावेतों दम खाल्ला तर, किल्ल्याला शचूंनी शह दिलाच आहे. तो ते सही केल्याशिवाय रहाणार नाहीत. बरें, स्वामीच्या समाधीचा भंग केल्यास स्वामी माझ्यावर कोपायमान होतील. आतां यावर तोड काय काढावी ? प्रत्येक गोष्टीवर तोड ह्मणून असतेच, या न्यायाने ( विचार केल्यासारखे करून ) यावर तोड इतकीच की, स्वामीचा पोषाक आपण चढवावा. ढाल तलवार हातांत घेऊन टुशमनांवर तुटून पडून त्यांना नेस्त नाबूद करावें. आजपावेतों स्वामीबरोबर युद्धकलेचें में अध्ययन केलें आहे, त्याची आज परीक्षाच आहे. तिरंदाजी करणे, भरधाव घोडा फेंकणे, भाला सफाईने मारणे, तलवारीने जानवें उतरणें, अचुक जाऊन शत्रूवर तुटून पडणे, छापा । घालन शत्रचा कमरगा फोडणे वगैरे गोष्टी स्वामीच्या कृपेनें मला अवगत झाल्या आहेत. स्वामीचें शिरस्त्राण मस्तकावर धारण करतों, ह्मणजे अपयश कधीहि येणार नाही. त्यांची ती विजयशालिनी भवानी तलवार हातांत घेतो आणि सूर्याच्या अश्वाला मागे टाकणारा असा जो बलाहक नांवाचा घोडा आहे त्याजवर स्वार होतो. त्यांचा पोषाक केला ह्मणजे सर्व फौज मला जनार्दनपंत देशपांडे सेनापती असेंच समजतील. ज्या यादववंशाचा हा किल्ला आहे. ते रामदेवराव जाधव, ज्यांच्यावर श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पूर्ण रुपा. त्यांच्या चरणांचे स्मरण करतो. आज्ञेशिवाय कोठे गेला, याची स्वामीमहाराज चौकशी करतील, त्यांच्या मनास त्रास पडेल, करितां येथे एक पत्रिका लिहून ठेवावी. त्यांत बादशहाचा सक्तीचा हुकूम,