पान:श्रीएकनाथ.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. स्नानाकरितां उष्णोदक तापवून तयार करून ठेवतो. पादप्रक्षालन स्वहस्ते करून आपल्या उत्तरीय वस्त्राने माझे पाय पुसून साफ करतो. तुळशी, बेल, नानाप्रकारची पुष्पें, धूपदीप, नैवेद्य, वगैरे सर्व पूजेचें साहित्य स्वतः मांडून धोतरें चुणून ठेवितो. माझें स्नान झाल्याबरोबर पादुका पुढे आणून ठेवितो. मला काही सेवकजनांला कमी आहे काय? परंतु तो आपल्या स्वतःला एकुलता एकच समजतो आहे. मी इकडे ध्यानस्थ बसलों की, आपण तबकांत तांबूल तयार करून ठेवतो. पिकदाणी धुण्याचें अमंगळ काम स्वतः हाताने मोठ्या प्रीतीने करतो. भोजनास बसलों झणजे माशा वारीत उभा राहतो.. माझें भोजन झाल्यावर उच्छिष्ट पात्रावर प्रीतीनें बसतो. अंगांत सुस्ती येईल ह्मणून अल्प आहार करतो. भोजन झाल्याबरोबर स्वहस्ताने मला तांबूल देऊन मी वामकुक्षि केली की, माझे चरण संवाहन करतो. त्याला असे वाटते की, याप्रमाणे जन्मभर माझी सेवा आपल्या हाताने घडावी. तीत कोणी वांटेकरी नसावा. असो, आतां नित्यनियमाप्रमाणे समाधि लावण्याची वेळ झाली आहे. (एकनाथ प्रवेश करतो. त्यास उद्देशून) एकनाथ, मी आतां समाधि लावतो. तूं पहा चावर सावध असावें. एकनाथ-स्वामीची आज्ञा प्रमाण. ( मोठ्या नम्रपणानें ) स्वजन जनार्दन, विजन जनार्दन । जन तो जनार्दन, होऊनी ठेलें ॥१॥ जनक जनार्दन, जननी जनार्दन । जीव तो जनार्दन, जीवनकळा ॥२॥ भाव जनार्दन, स्वभाव जनार्दन । देव जनार्दन, जेथें तेथें ॥३॥ एका जनार्दनी, आकळे जनार्दन । एका जनार्दन, निश्चळ तेथें ॥४॥ जप जनार्दन, तप जनार्दन । ब्रह्म जनार्दन, जेणे सहित ॥ ५॥ कर्भ जनार्दन, धर्म जनार्दन ।