पान:श्रीएकनाथ.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ श्रीएकनाथ. जाव्. ऐसा ये कीला मुस्तकीम् हय्. मय्ने अबि गनिमोंके छावनीमे जाके तालाश कीया, गनीमका इरादा ये हय् के, सुभों कीला तही करना. फिल्हाल उनूने किलेकू घेरा दीया हय्. लेकिन, ये कुच् । मुमकिन नहीं के गनीम् कीला सही करे. आप्ने फौरन् आपके फौज्वक्ष जनाब् जनार्दनपंत देशपांडे इन्कू तल्ब् करना. और तमाम् जमीयत्क फौरन् तय्यार होने के बारेमे संदेशा भेजकर बिल्फेल जंगकी तयारी जारी करना. दुश्मन् को कैद करके लायंगे. जनाबकी फतेमंदी खामखा होनेवाली, इसमे कुच शक नही. मेरे उस्तादे शरीफ् स्वामी जनार्दनके मेहेरबानीसे मय् चोर रास्तेसे इस मेहल्मे आया. आब् निकल जाताहूं. (गाणे म्हणत जातो.) बादशहा-तू मुजे बडा साधू नजर आता हय्. तेरे सवाल बहुती काबीलू और दिलमे रखने के लायक हय. (लैलेचा हात धरून) अय्. मेरे प्यारी जान् तू बेफिकीर रहिना. खुदा होतालाकी मेहेरबानीसे कुच् न तेढा हो जायगा. चलो उसकी याद करेंगे. (जातात.) प्रवेश २ रा. स्थळ-देवगड किल्ल्यावरील जनार्दनस्वामीची समाधि लावण्याची जागा. (कपाट उघडे असून स्वामीची समाधि लावण्याची तयारी चाललेली आहे.) जनार्दनस्वामी-( आत्मगत ) ज्याप्रमाणे ध्रुव बालक बापावर रुसून भगवंताप्रीत्यर्थ रानोरान भटकत फिरत होते, तसा हा एकनाथ ईश्वरप्राप्तीकरतां माझ्याकडे आला आहे. खरोखर हा ईश्वरी अवतारच आहे. माझें मोटें भाग्य ह्मणून याचे आगमन माझ्या आश्रमांत झाले आहे. नीच काम कसे करावें, याची शंका याच्या मनांत तिळमात्र येत नाही. चार घटका रात्र बाकी राहिली की, एकनाथ अंथरुणावर बिलकुल पडून रहात नाही. मोठ्या उल्हासवृत्तीने हातांत केरसुणी घेऊन सर्व देवघर झाडन साफ करितो. घरांत दासदासी असून त्या निद्रिस्त आहेत तोंच माझ्या