पान:श्रीएकनाथ.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. साच्या वंशांत मी एक अत्यंत मूढ, ज्याची वतनदारी केवळ मूर्खपणा, असा पैदा झालो आहे. आजपावेतों वेदाध्ययन केले. वडील मातोश्रीच्या ठिकाणी असलेली आजाआजी यांची मनोभावे सेवा केली. श्रीशंकराचे पूजनार्चन करीत आलो. चित्तांत हेतु हाच की, ज्ञानप्राप्ति व्हावी. प्रत्यक्ष श्रीचे दर्शन व्हावें. कांही तरी प्रसाद व्हावा. श्रीशंकराची याप्रमाणे रात्रंदिवस प्रार्थना करीत असतां गेल्या सोमवारी उत्तररात्री देवालयांत शंकराचे पिंडीवर मस्तक ठेविलें असतां पिंडीतून गंभीर स्वराने आकाशवाणीप्रमाणे ध्वनि झाला. जनार्दनस्वामी-अहाहा ! तूं मोठा भाग्यशाली आहेस ! तुझी आईबापांचे ठिकाणी असलेली पूज्यबुद्धि व आजाआजीची एकनिष्ठपणे केलेली सेवा पाहून श्रीशंकर प्रसन्न झाले. शंकराची दृढभाक्ति केलीस त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला यांत कांही संशय नाही. याला ढळढळीत उदाहरण श्रीपुंडलीकानें घालून ठेवलेंच आहे. त्याच्याकरितां पांडुरंगमूर्ति चंद्रभागेच्या तटाकी अजून तिष्ठत उभी आहे. तस्मात् ज्यांना वडीलमातोश्रीची सेवा घडत नाही ते परम अभागीच म्हणावयाचे. असो, एकनाथ, श्रीशंकराच्या पिंडीतून ध्वनि काय निघाला बरें! एकनाथ-माझें भाषण आपल्यास असत्य वाटेल, कारण मी 'अल्पमति यःकश्चित् मनुण्य आहे; तथापि मी आपल्यास अनन्यभावे शरण आहे. आपण सर्वसाक्षी परमेश्वर आहांत, असें मी समजतों. मी आपल्या चरणांची धूळ आहे. माझी इच्छा कायावाचामनेंकरून आपली सेवा करावी, अशी आहे. हाच हेतु मनांत धरून मी आलो आहे. पूर्ण करणे आपल्याकडेस आहे. मी अत्यंत मढ आहे. मला ज्ञान व्हावें. श्रीचे दर्शन व्हावें. श्रीचा प्रसाद व्हावा. श्रीशंकराच्या पिंडींतन हाच ध्वनि निघाला की, “ यवन बादशहाच्या पदरी देवगड किल्ल्यावर जनार्दनपंत देशपांडे महा सत्पुरुष आहेत त्यांना शरण जा. त्यांना गुरु कर, म्हणजे इष्ट हेतु सिद्धीस जातील." जनार्दनस्वामी-मी एक अत्यंत पतित आहे, माझा एवढा गौरख कसा झाला याचे मला आश्चर्य वाटते. मी आपल्याला एक पर