पान:श्रीएकनाथ.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ श्रीएकनाथ, मेश्वराचा दासानुदास म्हणवितों, याबद्दल मला तर काहीं अभिमान नाही, परंतु माझ्याबद्दल परमेश्वराला मात्र असला पाहिजे. कसा झणशील तर मोठमोठ्या राजांजवळ निशाणे असतात. लढाईचे वेळी सर्व फौजेनें काय करावयाचे, तर निशाणाजवळ बळ बांधून उभे रहावयाचे. कशाकरतां तर ती शत्रूच्या हातीं जाऊं नयेत. बरें, आतां निशाण ह्मणजे काय ? तर एक प्रकारचे चिरगूट-फडके-मग तें जरीचें असो, नाही तर खारव्याचे असो; त्याची काही विशेष किंमत नाही. परंतु तें राजाचे नांवानें मुद्रांकित. असते. त्या राजाच्या नांवाला किंमत असते. तसा देव भक्ताची महती वाढविण्याकरितां त्याच्या हातून काही तरी अमानुष कति करवीत असतो. अस्तु; मी तुला विन्मुख परत लावीत नाही. काही दिवस तूं या किल्ल्यावर माझ्याजवळ रहा. मला वाटते, श्री दत्तात्रेय तुझ्यावर रुपा करतील. तुझ्या अंगी पूर्ण योग्यता आल्यावर उपदेश आपोआप होईल. एकनाथ-महाराजांची आज्ञा प्रमाण. (एकीकडे ) आज सर्व सुरुतांचें फळ मिळाले. मी मोठा भाग्यवान् की, स्वामीची सेवा मजकडून होणार. आतां असा दिवस कधी उगवेल की, स्वामी माझ्यावर प्रसन्न होऊन मला अनुग्रह देतील ! मला श्रीदत्ताचें दर्शन करवितील ? जनार्दनस्वामी-तू फार थकलेला दिसतोस. चल माझ्याबरोबर, स्नानसंव्या आटोपून भोजन कर, झणजे तुला बरे वाटेल. (उभयतां जातात.)