पान:श्रीएकनाथ.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. ज्यांच्या लक्षांतहि येत नाहीं, वाऱ्याची धांव जशी सरळ असते, अथवा मातोश्रीपुढे जातांना बालकाच्या मनाला ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही, त्याप्रमाणे यांना आपपरभावना कांही माहित नाही. बादशहा मुर्तजा निजामशहा जो हल्ली अहमदनगरच्या निजामशाहीचा मालक आहे, त्याचा अम्मल किती करडा! एका हातांत समशेर व एका हातांत कुराण. अशा महमदीय मंडळीत हे स्वामीमहाराज आपला धर्म तलवारीच्या तिखट धारेप्रमाणे अप्रतिहत चालवीत आहेत ! हे पाहून कोणाचें मन आश्चर्यचकित होणार नाहीं ! ह्या पुण्यपुरुषाची त्रिकाल स्नानसंध्या, श्री गुरुदत्तात्रेय यांची महापूजा, समाधी, यांत तिळमात्र तरी अंतर येत आहे काय ? मी तर यांची अशी कीर्ति ऐकतों की, आत्मस्वरूपांत त्यांनी इतके प्राविण्य संपादन केले आहे की, त्यांना प्रत्यक्ष दत्तदर्शनाचाही लाभ वारंवार होत असतो. सुवर्णाला ज्याप्रमाणे पुढे देणे व्यर्थ, त्याप्रमाणे माझी स्तुति व्यर्थ होय. उत्तम मार्ग म्हटला झणजे त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून दंड जसा भूमीवर निचेष्ट पडतो, त्याप्रमाणे आपण स्वस्थ पडावें. (साष्टांग प्रणिपात करतो.) मा जनार्दनस्वामी-(एकीकडे ) हा तेजःपुंज केवळ मदनाचा पुतळा, कमलपत्राप्रमाणे विशाळ नेत्र, भव्य कपाळ, बम्हचर्य व्रत अंगी बाणलेला, असा हा कोण बरे असावा ? मला वाटतें, बम्हचारी वेषाने मला दर्शन देण्याकरितां अनसूयासुत अत्रिनंदन भगवान् श्री दत्तात्रेय तर आले नसतील ना ? कारण आज मी मघापासून मानसपूजा करण्याकरितां श्रीची मूर्ति ध्यानात आणण्याचा प्रयत्न करीत असतां, वरचेवर ही बम्हचारी मूर्तिच माझ्या ध्यानात येत असे. हा काय बरें चमत्कार असावा ! आज मला प्रातःकालपासून शुभचिन्हें होत आहेत. माझा उजवा डोळा लवत आहे. माझा उजवा बाहु स्फुरण पावत आहे. या सर्वांचे कारण तरी मला वाटते हेंच असावें. ( उघड ) तूं कोण आहेस ! येथें कां आलास ? एकनाथ-( हस्त जोडून अत्यंत नम्रपणानें ) महाराज,या देशाला एकनाथ म्हणतात. मी पैठणचा राहणारा. वडिलांचे नांव सूर्यनारायण. आजाचें नांव चक्रपाणी व पणजाचें नांव भानुदास. भानुदा