पान:श्रीएकनाथ.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

99 अंक १ ला. । पहिला कोळी-अर ल्येका ही गारठून गेलीया, अन् थंडीनं काकडूनशान गेलीया, पान्यानं प्वाट फुगलया, नाकातोंडांतून पानी गळतया, तिला आदुगर कुंभाराच्या चक्रावर नेऊनशान् घातली पाह्यजीया, आन् मंग तिच्या बापाला बलावलं पाह्यजीया; कसंर रामजी ? दुसरा कोळी-तुझी तिघ हिला घेऊनशान् कुंभाराच्या घरी जा. आन चाकावर घालूनशान गरगर गरगर फिरवा मंजे भडाभडा भडाभडा पानी वकूनशान् जाईल. आन प्वाट मोकळ होऊनशान् जाईल. आन् मी जाऊनशान् तिच्या आईबापासनी खबर देतुया. तिसरा कोळी-जा पन् बक्षीसाच संमद पैस यकटाच उपटूं नको. पैस आपून चौघजन सारख वाटूनशान घेऊ. पहिला कोळी-काय झन बक्षिसाच पैस ! बाजाराच्या आदुगर उचल्यांनी कंबरा बांधल्याती. आदुगर पोरगी जिवंत व्हईल तवा मंग बक्षीस, का मेलेली पोर पान्याच्या बाहेर काढलीया म्हुनशान् बक्षीस ? लै गाढवाच ल्येक श्येन झाल्याती. चल राम्या, जारे तूं तिच्या बापाकड आन् आह्मी जातों कुंभाराच्या हाकड हिला घेऊनशान्. ( मुलीस खांद्यावर टाकून जातात.) प्रवेश ४ था. स्थल-देवगिरीचा किल्ला. ( जनार्दनपंत समाधी लावून बसले आहेत.) एकनाथ-(प्रवेश करून ) सुंदर सरोवरांत ज्याप्रमाणे कमलिनी विकास पावतात, अथवा गर्भश्रीमानाच्या घरी जशी लक्ष्मी वास करते. त्याप्रमाणे क्षमा ज्यांच्या अंगी बाणलेली आहे; मेरुपर्वताला आपल्या शिखरांचा जसा भार होत नाही. अथवा ज्याप्रमाणे अनेक नदीनदांचे समुदाय मोठाले महापूर घेऊन आले तरी महासागर त्यांना आपल्या उदरांत सांठवितो, त्याप्रमाणे या संसारांत नानाप्रकारची दुःखें प्राप्त झाली असतां ज्यांचे हृदय कधी दुखंड होत नाही, इतकेच नाही; परंतु आपण दुःखाचे डोंगर गिळीत आहों, हैं