पान:श्रीएकनाथ.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. तिसरा कोळी-आन् पोटामंदी काट भरीनास गाढवाच्या ल्येका ! हाकड घराला आग लागलीया, आन तकड बायकोसनी म्हनतुया की, ढवऱ्याला बकरी किती मारायची म्हुनशान्. चला, आटपा, टाका उड्या. ( चौघेजण डोहांत उड्या घालतात.) चौथा कोळी-कायर रामजी, काय मागमूसबी नाही लागत, माझी दमछाट होईपोत मी तळाशी चाचपून पाह्यल, पन काही हा ताला लागत नाही. दुसरा कोळी-तू जागा बराबर नाही हेरलीस. हंग मी उभ राह्यलुया तकड नजर देऊनशान् बुडी मारली पायजीया म्हंजे खात्रीन घावल. तिसरा कोळी-अर पान्याच काम झटलं म्हंजे अस हाय की, जकड मनुक्ष बुडत तकडून पान्याच्या लोटासरस व्हावत व्हावत लांब जात. तव्हा आपून चहुंकड तळाशी चाचपून पाह्यल पायजे. घ्या येवाच नांव आन करा एकदा मनाचा धडा खोल पान्यामंदी जायचा. जे आई गंगे, एखांद्या कपारीत नाही तर खबदाडांत मातर आमा सनी आडकून देऊं नको. नाही तर प्वार गवसायची तर बाजूला राह्यली, आन् आमीबि तिच्या संग एखांद्या भगदाडांत आडकूनशान् बसायच झुंजी झाल. (गंगेचें नांव घेऊन चौघे पुनः बुड्या मारतात.) चौथा कोळी-आर घावलीर घावली यार. या धरूं लागा या. (दोघे धांऊन धरूं लागतात.) दुसरा कोळी-आर आगदी बच्चा हायर ! बारा तेरा वरसाची असल. माझी माय तूं, तुला काय सासुरवास झालाया ! तुझ्या जिवाला कसलं दुःख झालया? येवाला माहीत. तूं नदीमंदी उडी घातलीस इतकं तुझ्या जिवावर काय संकट आलं व्हतं ? रामाला माहीत. तिसरा कोळी-आर ही तर त्या पल्याडल्या आळीतल्या त्या मोठ्या हावेलीमधल्या देसपांड मनसबदाराची प्वार. ही तर लै लै शीरमिताची है. येवा ही जर जगली तर आमच कोट कल्याम व्हईल बगा. हिचा बाप लै नामी मनुक्ष है. आन् त्येला ही एवढीच पोरगी हाय. आन् ही त्या चक्करपानीच्या एकनाथाला यायची ठरली व्हती. मंग अस कस झाल कोन जान.