पान:श्रीएकनाथ.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. Vergo ॥ चाल ॥ तेव्हां देखिले गोपीनाथ, गोपीनाथ, अवघ्याच झाल्या लज्जित, लज्जित, टाकिल्या उड्या पाण्यांत, पाण्यांत ॥८॥ ऐशी याची मात, नारि, जोडिति हात, हरि घाल माणसांत, नको करूरे गलबला, हात जोडून शरण आल्या विनवीति कृष्णाला ॥९॥ एक बाहेर निघून, एक उभी राहून, एक खाली बसूनकरा सूर्याशी नमस्कार, खुप मजा पाहिन क्षणभर ॥ १०॥ ॥ चाल ॥ एक तिथेच फिरे गरगर, गरगर, एक पिंगा घालून दाविती, दाविती एक पक्वा ललकारिती ललकारिती, गदगदा हंसे श्रीपती, श्रीपती ॥ ११॥ कळंबावरून जिची तिला वस्त्रे देऊ लागला, उतरुन कळंबातळी कृष्णाने रजा दिली अवघ्याला ॥॥१२॥ (एक कोळी घाबऱ्या घावऱ्या प्रवेश करतो.) पहिला कोळी-कायरे रामजी, इतका घाबरलास काय म्हून ! दुसरा कोळी-म्हनजे, आर ल्येका मी आपल्या परत्यक्ष डोळ्यांनी पाह्यलं, आन राव मी धावत धावत यतुया तो इतक्यामंदी दिली गंगच्या ढवांत उडी ठोकूनश्यान एका बामनाच्या पोरीन. अन तुम्ही आपल गान्याच्याच नादांत. तिसरा कोळी-बामनाची व्हती व्हयर ? चौथा कोळी-पन गाढवाच्या लेकान, आतां बामनाची प्वार व्हती का महाराची व्हती, तिचा जीव चाललया, नाही तर मेलीबि असल. झटकन् उडी टाकूनशान तिला बाहेर काढायची आटुगर, का तिची जात आन् गोत पुसत बसायच ? पहिला कोळी-तसं नाह्यर, बामनाची असली आन शिरीमंताची असली, तर पोटाची चंगल व्हईल म्हून म्हनतो. दुसरा कोळी-आन् नाही पोटाला दिल म्हुनशान् का नदीमंदी मानूस मरून येतुस व्हय ? मंग गांवामंदी कुनी राहूबि येनार नाही.