पान:श्रीएकनाथ.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. कोसळतात, परंतु मी आपली काळाची काकडी जिवंतच ! क्षणोक्षणी मला माझ्या एकुलत्या एक मुलाची आठवण होऊन पोटांत भडभडून येत असे, पण मी नाथाकडे पाहून समाधान मानून घेत असें. आतां कोणाकडे पाहं ? एक दिवस आह्मां उभयतांची सेवा केल्याशिवाय त्याने घालविला नाही. किती तरी तुझे गुण आठवू ? (निचेष्ट पडते.) प्रवेश ३ रा. स्थळ-गंगानदीचा डोहो. (दोन चार कोळी सांगडी घेऊन गाणे म्हणत प्रवेश करतात.) गाणे. आतां मारि फटफट, उभा धिट हलगट, मारिन चपट, हरि वाट सोड ह्मणते रे मला, कोण प्रहरची विनंति करते, करुणा येईना तुला ॥१॥ यश्वदेचा हरि, आह्मीं सासुरवाशी नारी, जातो यमुनेच्या तिरी, जातो आंघोळ करण्यासाठी, सोड नको धरूं रे मनगटी ॥२॥ नको करूं किरकिर, झाला उशिर, घरी सांगेल दिर, माझ्या चाहत्यारे आवघ्या गोष्टी, सासु कजाग लागेल पाठी ॥३॥ करुणा दाबुन, मग रजा घेऊन, कळंबातळीं येऊन, मग हर्ष मावेना पोटीं, आह्मीं ठकीवला जगजेठी ॥४॥ ॥ चाल ॥ अगे मायावसने फेडा, अगे फैडा, बांधा भक्तीचा जुंबडा, मुंबडा, टाकिती उड्या धडधडा, धडधडा ॥५॥ इतके ऐकून, हरि आला लपून, वस्त्रे घेतली छपून, देव कळंबावरी चढला, अवघड होती फांदी त्याच्यावर जाऊनशनी बैसला ॥६॥ एक बाहेर निघून, एक उभी राहून, एक खाली बसून,. पाहू पाहू दमल्या, हिवें भरली तह फुगल्या ॥७॥